

Crime News : पणजी, तीन अल्पवयीन मुलांना बेसबॉल बॅटने मारहाण केल्याप्रकरणी पणजी बालन्यायालयाने पेडण्याचे माजी नगराध्यक्ष वासुदेव राजेंद्र देशप्रभू यांना तीन महिने साधी कैद व १ लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या शिक्षेला आव्हान देण्यासाठी देशप्रभू यांना संधी मिळावी म्हणून बालन्यायालयाच्या अध्यक्ष सायोनारा तेलीस यांनी ही शिक्षा १२ डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवली आहे. मारहाणीची ही घटना दहा वर्षापूर्वी घडली होती.
बालन्यायालयाने वासुदेव देशप्रभू यांना २५ सप्टेंबर २०२३ रोजी दोषी धरले होते व शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलली होती. भादंसंच्या कलम ३२४ (दुखापत करणे) अंतर्गत ५ हजार रुपये दंड व तो न भरल्यास १ महिना साधी कैद,
कलम २०१ खाली (पुरावा नष्ट करणे) ५ हजारांचा दंड व तो न भरल्यास १ महिना साधी कैद, बालकायदा कलम ८ (२) खाली ३ महिने साधी कैद व १ लाख रुपये दंड व तो न भरल्यास ४ महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. पान १२ वर
दंडाची रक्कम जमा केल्यास त्यातील ५० हजार रुपये पीडित मुलाच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत कायम ठेवण्यात यावेत असेही निवाड्यात नमूद करण्यात आले आहे.
या खटल्यावरील सुनावणीवेळी सादर करण्यात आलेल्या अहवालात मारहाणीसाठी वापरलेली बेसबॉल बॅट गायब करणे व मारहाण झालेल्या मुलाला गंभीर जखमा झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आरोप पुराव्यानिशी सिद्ध होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
काय आहे प्रकरण?
म्हापसा येथील साल्ढाणा इमारतीच्या छतावर तीन मुलगे खाद्यपदार्थ खात बसले होते. याच इमारतीत वास्तव्यास असलेले वासुदेव देशप्रभू यांनी त्या मुलांना तेथून जाण्यास सांगितले. परंतु ती गेली नाहीत.
त्यानंतर देशप्रभू यांनी बेसबॉल बॅटने त्यांना मारहाण केली व धमकीही दिली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या मुलाच्या पालकांनी म्हापसा पोलिसांत देशप्रभू यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर ४ ऑक्टोबर २०१३ रोजी गुन्हा दाखल केला होता. तसेच देशप्रभू यांना १ मे २०१४ रोजी अटक करून त्याच दिवशी जामिनावर सोडण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.