Pernem News: आश्चर्य! म्हापशात एका नारळासाठी लागली तब्बल 10 लाखांची बोली

10 lakh coconut Goa: पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील श्री देव रघुघोण शेट मंदिरात एका पवित्र नारळासाठी तब्बल १० लाख रुपयांची विक्रमी बोली लागली
coconut bidding story
coconut bidding storyDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापशातील एका मंदिरात झालेल्या लिलावात एका नारळासाठी १० लाख रुपयांची बोली लागली. वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे! पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील श्री देव रघुघोण शेट मंदिरात एका पवित्र नारळासाठी तब्बल १० लाख रुपयांची विक्रमी बोली लागली. शुक्रवारी (दि.१८) मंदिराच्या वर्धापन दिनाच्या उत्सवात झालेल्या लिलावात हा आश्चर्यकारक आकडा समोर आला.

कोरगावमधील पेठेचावाडा येथे श्री देव रघुघोण शेट मंदिराचा वर्धापन दिन दरवर्षी एप्रिलमध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला शेट्ये कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पाच दिवसीय उत्सवात केवळ पेडणे तालुकाच नव्हे, तर दूरदूरहून भाविक सहभागी होतात.

गेल्या काही वर्षांपासून या उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरतोय तो श्री देव रघुघोण शेट या मंदिरात होणाऱ्या सत्यनारायण महापूजेतील पवित्र नारळाचा लिलाव. मिळालेल्या माहितीनुसार अनेकवेळा हा लिलाव शेट्ये कुटुंबातील सदस्यच जिंकतात. मात्र, यावर्षी एका स्थानिक भाविकाने तब्बल १० लाख रुपयांची बोली लावून हा मान मिळवला

या पवित्र नारळ जिंकल्यानंतर बोलीदाराच्या घरी विधिवत पूजा केली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी या नारळासाठी ११ लाख रुपयांची बोली लागली होती.

coconut bidding story
Goa News: व्हीव्हीएमच्या जी.आर.केअर कॉलेजला "टॉप आउटस्टँडिंग लॉ स्कूल्स ऑफ एक्सलन्स" चा सन्मान

मंदिराच्या समितीतील एका सदस्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार “लोकांची या देवावर श्रद्धा आणि विश्वास आहे. संकटाच्या वेळी फक्त त्यांचे नाव जरी घेतले तरी देव मदतीला धावूनयेतो आणि याच श्रद्धेमुळे अनेक भाविक या देवस्थानाची पूजा करतात.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com