Pernem: असे रस्ते पाहून पर्यटक पुन्हा गोव्यात येतील का? हरमल, पेडणे, तेरेखोल परिसर हरवला खड्ड्यांत; नागरिक, वाहनचालकांत संताप

Bad Road In Goa: हरमल, कोरगाव-पेडणे तसेच केरी-तेरेखोल रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालक संताप व्यक्त करीत आहे.
Goa Bad Road
Goa Bad RoadDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: हरमल, कोरगाव-पेडणे तसेच केरी-तेरेखोल रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालक संताप व्यक्त करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता पूर्णतः खराब स्थितीत असून या रस्त्यावर वाहन चालवताना चालकांची त्रेधातिरपीट होत असते.

हरमल ते पेडणेपर्यंतच्या १८ किलो मीटर रस्त्यात पूर्ण खड्डे असून कित्येक ठिकाणी चर खोदून ठेवल्याने अनेकांना वाहने हाकणे अवघड जात आहे. कित्येकदा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकेरी वाहतूक करावी लागते. तसेच वाहने नादुरुस्त व अपघातचे प्रसंग उद्‍भवतात, असे वाहनचालक सुनील पेडणेकर यांनी सांगितले.

केरी-तेरेखोल रस्त्याचीही स्थिती पूर्ण खराब झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात, मात्र रस्त्यांवरील खड्डे बुजविसाठी सरकार खर्च का करत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत.

Goa Bad Road
Goa Road Accident: गोव्यात मागील 5 वर्षात रस्ते अपघातात 1,022 जणांनी गमावला जीव

लोकांत तीव्र नाराजी

मोपा विमानतळ प्रकल्पामुळे पेडणे तालुक्याचे भाग्य पालटणार असे स्वप्न दाखवण्यात आले होते. परंतु येथील रस्त्यांची स्थिती पाहिल्यास पेडणेकरांच्या तोंडास पाने पुसण्यास आल्याचे दिसून येते. सरकार येथील रस्त्याची साधी निगा राखू शकत नाही, याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Goa Bad Road
Pernem: पेडण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गवंडी कामाला ‘सहकार्य’ करण्याची गरज, कारागिरांची मागणी; परप्रांतीयांचा प्रवेशामुळे व्यवसाय धोक्यात

पर्यटनावर परिणाम

पेडणेतील किनारी भागात मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येतात. मात्र येथे येताना ज्या रस्त्यांवरून या पर्यटकांना प्रवास करावा लागतो, ते पाहिल्यास हे पर्यटक पुन्हा गोव्यात येतील की नाही याबाबत संशय व्यक्त होत आहे. अगोदरच विदेशी पर्यटकांची संख्या घटू लागल्याने पर्यटन व्यावसायिक चिंतेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com