Goa News : खाजने, अमेरेची पुरापासून मुक्तता : जलस्रोतमंत्री शिरोडकर

Goa News : ‘मोपा’वरील पाणी रोखण्यासाठी संरक्षक भिंतीचे काम
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

पेडणे मोपा विमानतळ पठारावर पावसाळ्यात सोडण्यात येणारे पाणी यापुढे खाजने अमेरे पोरस्कडे गावाला बाधा आणणार नाही,असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

जल स्तोत्र खात्यातर्फे सुमारे सात कोटी अकरा लाख रुपये खर्चून सुमारे सव्वा किमी लांबीची संरक्षक भिंत तसेच नाल्याचे काम हाती आले आहे. या कामाचा शुभारंभ मंत्री शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

येत्या १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मंत्री शिरोडकर यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, खाजने अमेरे पोरस्कडे सरपंच प्रीती हळदणकर उपसरपंच सिद्धी गडेकर, पंच निशा हळदणकर, रुपेश हळदणकर, मुकुंद खाजनेकर, वारखंड-नागझर सरपंच मयुरी तुळसकर, उपसरपंच वसंत नाईक, तांबोसे-मोपा-उगवे चे सरपंच सुबोध महाले, जलस्रोतचे कार्यकारी अभियंता नाजारेथ , साहाय्यक अभियंते श्री. परुळेकर, देवस्थानचे अध्यक्ष आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री शिरोडकर यावेळी म्हणाले, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी याविषयी आपल्याकडे मागणी केली होती. पावसाळ्यात मोपा विमानतळ पठारावरील पाणी खाजने अमेरे-पोरस्कडे पंचायत क्षेत्रातील घरात शिरते. त्यामुळे भागात पूरस्थिती निर्माण होते. अनेक बागायती, शेती तरीच मंदिर आणि घरात पाणी मरून लोकांचे गेल्या दोन वर्षांत नुकसान झाले. हे यापुढे होणार नाही. यासाठी संरक्षक भिंत उभारून ते पाणी रोखले जाणार आहे, अशी माहिती मंत्र्यांनी यावेळी अमेरे येथे दिली.

पंच निशा हळदणकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन देवानंद गावडे यांनी केले. सरपंच सुबोध महाले यांनी आभार मानले.

Goa
CVoter Survey Goa: भाजप का काँग्रेस, गोव्यात लोकसभेला कोण जिंकणार? सी-व्होटर सर्व्हे काय सांगतो?

मोपा विमानतळामुळे पावसात पठारावरील पाणी अमेरे भागात येते. त्यामुळे या भागातील शेती, बागायतीत भरून राहिल्यामुळे लागवड नष्ट झाली. मातीचा भराव शेत मळ्यात गेल्याने शेतजमीन नापीक झाली. अमेरे येथील मंदिर, तसेच घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. हे पाणी रोखण्यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा केला. याला मंत्री सुभाष शिरोडकर यांनी साथ दिल्याने आज हे काम सुरू होत आहे.

-प्रवीण आर्लेकर,आमदार पेडणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com