Water Shortage: तुयेमध्ये पाण्याची टाकी फक्त नावालाच; पाणी समस्या सुटता सुटेना

Water Shortage: विधानसभा निवडणुकीनंतर पुढील प्रक्रिया थंडावली आहे.
Tuem Water Tank
Tuem Water TankDainik Gomantak

Tuem: तुये पंचायत क्षेत्रातील तुये सोणये या परिसरात पाण्याची समस्या जटील बनली आहे. तत्कालीन आमदार दयानंद सोपटे यांनी गावकरवाडा तुये येथे एक खास पाण्याची टाकी उभारली होती. विधानसभा निवडणुकीनंतर पुढील प्रक्रिया थंडावली आहे,जी आजपर्यंत पूर्ण झाली नसल्यामुळे या परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काहीजण विहिरीचे पाणी आणतात. तर विहीर नसणाऱ्यांना विहीर मालकांची पाण्यासाठी बोलणी खावी लागतात, अशी व्यथा रहिवाशांनी व्यक्त केली.

एका बाजूने सोणये तुये परिसरात पाण्याची समस्या आहे तर दुसरीकडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या जलवाहिन्या फोडण्याचे काम सध्या भूमिगत वीज वाहिन्या घालणारे कंत्राटदार करत आहेत. त्यामुळे लोकांना पाणी समस्येबरोबरच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहतूक कोंडीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे,असे स्थानिक पंच उदय मांद्रेकर यांनी सांगितले.

पेडणे तालुक्यात आलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळ, आयुष हॉस्पिटल, इलेक्ट्रॉनिक्स सिटी, असे प्रकल्प पाण्याचे नियोजन न करता सरकारने पुढे आणलेले आहेत. सरकारने अगोदर व्यवस्थित पाणीपुरवठा करून नंतरच या प्रकल्पांना पाण्याची सोय करायला हवी होती.

चांदेल पाणी प्रकल्पातून अनियमित पाणीपुरवठा होतो. आमचा कुठल्याही प्रकल्पाला पाणी देण्याला विरोध नाही, परंतु आमच्या तोंडचे पाणी पळवू नका, अशी मागणी तुयेवासीयांकडून होत आहे.

Tuem Water Tank
Dabolim Airport : दाबोळी विमानतळाचं भवितव्य काय? वाहतूक मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

टॅंकरने पुरवठा किती दिवस?

मांद्रे मतदारसंघातही पाण्याची गंभीर समस्या आहे. मात्र, आमदार जीत आरोलकर यांनी मात्र वेळोवेळी जनतेला टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला आहे. दर महिन्याला किमान दीडशे ते पावणे दोनशे टँकर पाणीपुरवठा केला जातो. शिवाय चार ते साडेचार लाख रुपये खर्च होतात,असे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पाणी कुठे मुरते कळेना !

पेडणे तालुक्यात एकूण 20 ग्रामपंचायती व एक पालिका असून पेडणे आणि मांद्रे अशा दोन मतदारसंघांचा समावेश आहे. पेडणे पाणी विभागाकडून तालुक्यासाठी एकूण 18,287 नळ जोडण्या आहेत. चांदेल प्रकल्पातून 15 एमएलडी पाणी रोज सोडले जाते. ते कुठे मुरते याचा पत्ताही पाणी विभागाला लागत नाही.

उदय मांद्रेकर, पंचसदस्य तुये-

गावकरवाडा तुये येथील पाण्याची टाकी तातडीने कार्यान्वित करून लोकांना पाणी समस्येपासून सोडवावे. लोकांचे पाण्याविना हाल होत असून सरकारने पाणी समस्या सोडवण्यासंबंधी दिरंगाई करू नये.

  • 18,287 नळ जोडण्या पेडणे तालुक्यात आहेत.

  • 15 एमएलडी पाणी चांदेल प्रकल्पातून दरदिवशी सोडले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com