VIDEO: छताचा तुकडा कोसळला, सरकारी कर्मचारी झाला जखमी; पेडणेतील घटना

Pernem Office Roof Collapse: पेडणे येथील सरकारी संकुलात असलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाच्या छताचा एक मोठा तुकडा पडल्याने सुजय गावडे हे कर्मचारी जखमी झाले आहेत.
VIDEO
VIDEODainik Gomatnak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे येथील सरकारी संकुलात असलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाच्या छताचा एक मोठा तुकडा पडल्याने सुजय गावडे हे कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. सरकारी संकुलाची ही इमारत जुनी झाल्यामुळे या इमारतीत असलेल्या अन्य कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांमध्येही आता भीती पसरली आहे.

या घटनेनंतर पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, संयुक्त मामलेदार प्रवीण गावस तसेच पेडणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंते सिद्धेश हुम्रसकर यांनी या कार्यालयाची पाहणी करून संबधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

तसेच जवळच्या मनुष्यबळ विकास कार्यालयालाही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना नाईक यांनी केल्या आहेत. माहितीनुसार, २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पेडणे इमारत बांधकाम कार्यालयातर्फे आपल्या मुख्य कार्यालयाकडे या कार्यालयाच्या छताच्या दुरुस्तीसाठीचा सुमारे १२ लाख रुपयांचा आराखडा पाठवण्यात आला होता.

VIDEO
VIDEO: साळगावमध्ये 'रेंट-ए-बाईक' वादातून राडा, टोळक्याकडून पिता-पुत्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

त्याची निविदा काढायची आहे. पण, त्यापूर्वीच अशाप्रकारे छताचा तुकडा खाली पडला. वेळीच दुरुस्ती केली असती तर आजची घटना घडली नसती.

VIDEO
Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

१९९० मध्ये पायाभरणी

या संकुलाची पायाभरणी १९९० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते पेडण्याचे तत्कालीन आमदार शंकर साळगावकर यांच्या हस्ते झाली होती.

त्यानंतर काही वर्षे या संकुलाच्या छपरावर कौले किंवा पत्रेही घालण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात छताला गळतीही लागली होती. त्यानंतर, काही वर्षांनी या इमारतीच्या छप्परावर कौलांचे छप्पर घालण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com