Goa Made Alcohol Seized : न्हयबाग येथे 4.5 लाखांची दारू जप्त; एकास अटक

Goa Made Alcohol Seized : त्यासंबंधी पेडणे पोलिसांनी चालकाला दारू वाहतूक करण्याचा परवाना मागितला असता चालक दाखवू शकला नाही.
Goa Made Alcohol Seized
Goa Made Alcohol SeizedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Made Alcohol Seized

पेडणे पोलिसांनी काल रात्री न्हयबाग येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ वर ४ लाख ३५ हजार रुपयांची अवैध दारू पकडली. या प्रकरणी पोलिसांनी दारुची बेकायदेशीर वाहतूक करणारी मिनी पिकअप ताब्यात घेऊन अजित सुखदेव कांबळे (२६,रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली.या मिनी पिकअपची किंमत ६ लाख रुपये होते.

पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे हे काल रात्री सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना (एम एच-४३ , बी एक्स-१६२०) मिनी पिकअप महाराष्ट्राच्या दिशेने जात असता त्यांनी ती थांबवून तपासणी केली. तपासणीत दारूच्या पेट्या आढळून आल्या.

Goa Made Alcohol Seized
South Goa : दक्षिण गोव्यात चोरट्यांची टोळी सक्रिय; आंध्रप्रदेशातील टोळीची शक्यता

त्यासंबंधी पेडणे पोलिसांनी चालकाला दारू वाहतूक करण्याचा परवाना मागितला असता चालक दाखवू शकला नाही. या दारूत गोल्डन एस ब्ल्यू फाईन व्हीस्की च्या ७५ पेट्या, त्यात प्रत्येकी बाटलीत ७५० मिलिलीटर व्हिस्की मिळून एकूण ६५७ लिटर व्हीस्की तर ब्लॅक अँड ब्लॅक रम च्या ७२ पेट्या सापडल्या.

मिळून एकूण १,३०५ लिटर मद्याचे प्रमाण आहे.पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्यासह उपनिरिक्षक योगेश मांद्रेकर,सहाय्यक उपनिरीक्षक आनंद परब व सहकाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. नंतर पकडलेली ही बेकायदेशीर दारू पेडणे अबकारी कार्यालयाकडे सुपूर्द केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kunal Thakur Disability Achievements
Pedne Crematorium Body
mini bus hits two wheeler in Goa
Goa Liquor Smuggling
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com