मायकल लोबोंच्या शिष्टाईनंतर शॅकधारकांची दिवाळी, पूर्वीच्याच जागी शॅक उभारणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पर्यावरण खात्याने घातलेल्या मर्यादांमुळे एका वाड्यावरील व्यावसायिकाला दुसऱ्या वाड्यावर शॅकचे वाटप झाल्याचे प्रकार घडले होते.
Goa Beach Shack
Goa Beach ShackDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beach Shack: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी यशस्वी शिष्टाई करत शॅक व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला आहे. पूर्वीच्याच जागी शॅक घालण्यास जागा द्या, असा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याने शॅकवाल्यांनी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.

पर्यावरण खात्याने घातलेल्या मर्यादांमुळे एका वाड्यावरील व्यावसायिकाला दुसऱ्या वाड्यावर शॅकचे वाटप झाल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे साहजिकपणे शॅक व्यावसायिकांत नाराजी होती.

पर्यावरण खात्याने आम्हीच शॅक घालण्यासाठी जागा ठरवून देणार अशी ताठर भूमिका घेतली होती. पर्यटन खात्यानेही पर्यावरण खात्याने ठरवून दिलेल्या ठिकाणीच शॅक परवाने देणार, असे ठरवले होते.

त्यानुसार शॅक परवान्यांसाठी सोडत काढण्यात आली. त्यानंतर परवाने मिळवण्यासाठी पैसे अदा करण्याचा टप्पाही सुरु करण्यात आला होता. परवाने मिळणे पुढील आठवड्यापासून सुरू होणार होते.

असे असले तरी शॅक व्यावसायिकांच्या मागण्यांचा सुरवातीपासून पाठपुरावा करणारे लोबो स्वस्थ बसलेले नव्हते. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे संधी मिळेल तेथे हा विषय काढणे सुरूच ठेवले होते. शॅक व्यावसायिकांच्या समस्या घेऊन मधल्याकाळात दोन तीन वेळा ते मुख्यमंत्र्याना भेटले. त्यांनी आजही शॅक व्यावसायिकांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हा प्रश्न कायमचा सोडवून घेतला.

नव्या जागेवर शॅक घालण्याबाबतचा वाद संपवताना मुख्यमंत्र्यांनी 2019 ते 2022 दरम्यान ज्या जागांवर शॅक घालण्यात येत होते त्याच जागेवर यंदाही शॅक घालण्यास द्या असा आदेश जारी केला. याविषयावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे व लोबो यांचे शीतयुद्ध सुरू झाले होते.

शॅक व्यावसायिकांना कोणी तरी फितवत आहे, भडकावत आहे असा आरोप वारंवार खंवटे करत आले आहेत. लोबो हेही पर्यटन खाते आठमुठी भूमिका घेते, व्यावसायिकांना विश्वासात घेत नाही, असा आरोप करत होते. तूर्त या संघर्षात मुख्यमंत्र्यांचे मन वळवण्यात यश आल्याने लोबो यांची सरशी झाल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com