Sand Mining: तेरेखोल नदीतील रेती उपशावर कायमची बंदी शक्य, 'NIO'नं जैवहानीविषयी व्यक्त केली चिंता

Terekhol River Sand Mining: ‘एनआयओ’कडून अंतिम अहवाल आल्यावर नदीतील जैवविविधता टिकवण्यासाठी रेती उपशावर बंदी घालण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू झाला आहे.
Terekhol River Sand Mining
Terekhol River Sand MiningDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : तेरेखोल नदीतून रेती उपसा करण्यावर कायमची बंदी येऊ शकते. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने राज्य सरकारला दिलेल्या अंतरिम अहवालात या नदीतील बेसुमार रेती उपशामुळे झालेल्या जैवहानीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळेच रेती काढण्यासाठीचे परवाने देण्यासाठी मांडवी आणि शापोरा नदीचा विचार करताना सरकारने केलेला नाही. ‘एनआयओ’कडून अंतिम अहवाल आल्यावर नदीतील जैवविविधता टिकवण्यासाठी रेती उपशावर बंदी घालण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू झाला आहे. येत्या दोन महिन्यांत ‘एनआयओ’कडून अंतिम अहवाल मिळेल, असे सरकारला वाटते.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या या प्राथमिक निरीक्षणानंतर सरकारी पातळीवर याची गंभीर दखल घेतली गेली जात आहे. सध्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत असून, तो मिळाल्यानंतर तेरेखोल नदीच्या पात्रातून रेती उपशास परवाने नाकारण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Terekhol River Sand Mining
Goa News: सरकारी आदेशाला केराची टोपली, पिसुर्लेत रस्त्याचे खोदकाम सुरुच; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

तेरेखोल नदी ही सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्यातील नैसर्गिक सीमा दर्शवणारी प्रमुख नदी आहे. ही नदी केवळ जलवाहतूक किंवा स्थानिक वापरापुरती मर्यादित नसून तिचा जैविक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मोठा उपयोग आहे. रेती उपशामुळे खाडीतील गाळ, प्रवाह आणि जलचक्रात झालेला बदल ही चिंतेची बाब असून, यामुळे किनारपट्टीची धूपही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहवालात रेती उपशाचा पंचनामा

  • ‘एनआयओ’च्या अहवालात नमूद केले आहे की, तेरेखोल नदीपात्रातून तब्बल १४ मीटर खोलपर्यंत रेती उपसा केला आहे.

  • ही खोली सामान्य मानकांपेक्षा खूपच जास्त असून, याचा थेट परिणाम नदीच्या जैविक परिसंस्थेवर झाला आहे.

  • मत्स्यसंपत्ती, मृद्जीव, तसेच किनारी जैवसाखळी यांच्यावर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.

  • यामुळे तेरेखोल नदीपात्रातील जैवविविधतेचे संरक्षण अत्यंत आवश्यक बनले आहे.

Terekhol River Sand Mining
Goa Travel Guide: गर्लफ्रेन्ड, बायको किंवा मित्रांसोबत गोवा फिरायचाय? कुठं फिराल, काय खायचं - प्यायचं, खर्च किती येईल? वाचा एका क्लिकवर

सागरी जैवविविधता धोक्यात

दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने सादर केलेल्या अंतरिम अहवालात तेरेखोल, केरी, किरणपाणी, देवसू, न्हयबाग, पोरस्कडे, उगवे, तांबोसे, तोरसे, सक्राळ येथून वाहणाऱ्या तेरेखोल नदीच्या पर्यावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अहवालानुसार बेसुमार आणि अनियंत्रितपणे केलेल्या रेती उपशामुळे नदीचे पात्र प्रचंड प्रमाणावर खरवडले गेले असून, सागरी जैवविविधता धोक्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com