शिक्षित आणि सुरक्षित गोव्यात दर महिन्याला 5 बलात्काराची प्रकरणे

गोव्यातील बलात्कार प्रकरणांची टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारी पेक्षा साडेतीन टक्क्यांनी जास्त
percentage of rape cases in Goa is three and a half per cent higher than national average
percentage of rape cases in Goa is three and a half per cent higher than national averageDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: शिक्षित आणि सुरक्षित राज्य प्रतिमा असलेल्या गोव्यात (Goa) दरमहा सरासरी 5 बलात्काराची प्रकरणे (Rape Case) नोंद होत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे शाखेच्या नोंदीतून पुढे आले असून गोव्यातील बलात्कार प्रकरणांची टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारी पेक्षा साडेतीन टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रीय क्राईम ब्युरोने काल 2020 च्या गुन्ह्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्यात गेल्या वर्षभरात गोव्यात 60 प्रकरणांची नोंद झाली असून यातील 66 टक्के बलात्कार अल्पवयीन मुलींवर झालेले आहेत. गोव्यातील बलात्कार प्रकरणांची एकूण टक्केवारी 7.8 टक्के एव्हढी असून राष्ट्रीय टक्केवारी (4.3 टक्के) पेक्षा अधिक आहे. 2020 सालात गोव्यात इतर गुन्हेगारी प्रकरणांतही 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

percentage of rape cases in Goa is three and a half per cent higher than national average
Goa Mining Draftला राज्यपालांची मान्यता

यातील समाधानाची बाब म्हणजे मागच्या वर्षात गोव्यात एकाही ऍसिड हल्ल्याचे किंवा हुंडाबळीचे प्रकरण नोंद झालेले नाही. मात्र विनयभंगांच्या 67 प्रकरणांची नोंद झाली आहे. महिलांवर होणाऱ्या शारीरिक अत्याचाराच्या प्रकरणांत 3.4 टक्क्यांनी तर लैगिंक अत्याचार प्रकरणात 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गोवा हे महिलांसाठी सुरक्षित राज्य मानले गेले असले तरी कामाच्या ठिकाणी लैगिंक छळ होण्याच्या घटनातही 0.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

percentage of rape cases in Goa is three and a half per cent higher than national average
Goa: बागा-कळंगुटात 'दृष्टी'च्या जीवरक्षकांकडून सहा मच्छीमारांना जीवदान  

राष्ट्रीय ब्युरोच्या आकडेवारी प्रमाणे 2020 साली गोव्यात 398 चोरीच्या आणि 148 वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गतवर्षी 174 प्रकरणे नोंद झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com