Goa News:...यामुळे गोव्यात शीतपेयांना मागणी वाढली

उन्हामुळे लोकांचा थंड पदार्थांकडे कल वाढला आहे.
Goa News |Cold Drinks
Goa News |Cold DrinksDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिक उष्म्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे एप्रिल, मे पर्यंत काय स्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाहीये. फेब्रुवारीत सहसा सौम्य थंडीचा असतो. त्यात रात्रीची थंडी व दिवसाचा तापमान वाढल्याचे दिसून येते आहे. वातावरणातील हे बदल आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. उष्म्यामुळे लोकांचा थंड पदार्थांकडे कल वाढला आहे.

फेब्रुवारी महिन्यातच शाळेतून घरी येताना मुलांचा घाम गाळत परत येत असल्याने मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची त्यांनाही काळजी वाटत आहे. त्याचबरोबर नागरिकांसुध्दी उष्णताचा परिणाम जाणवत आहे.

बाहेर बाजारात किंवा इतर ठिकाणी प्रवास करताना उष्णातुन जीव हैराण झाल्या सारखा होतो. आठवड्यापासून उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागल्याने रसरशीत फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. मंगळवारी वाळपई आठवडा बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात कलिंगड, मोसंबी, द्रांक्षे त्याचप्रमाणे इतर फळे देखील विक्रीसाठी होती.

मात्र, जास्त नागरिक कलिंगड व द्रांक्षे खरेदी करताना दिसत होते. केवळ चवीसाठी नाही तर डाएटसाठीही हंगामी फळांना चांगलीच पसंती मिळत आहे. तापमानात वाढ झाल्याने कलिंगड, द्रांक्षे, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, शहाळे यांसारख्या फळांना मागणी वाढलेली आहे.

Goa News |Cold Drinks
Saptakoteshwar Temple: सप्तकोटेश्वर मंदिराचे शनिवारी लोकार्पण

शीतपेयांना मागणी वाढली

वाढत्या उष्णतेमुळे शरीराला घाम जास्त येतो. या कारणाने शरीरातील पाण्याचा अंश कमी झाल्याने शरीराला तहान लागते. कृत्रिम शीतपेय किंवा फ्रिजच्या थंड पाण्याने ही तहान भागवण्याचा पर्याय अनेकजण स्वीकारतात.

वाळपई येथील काणेकर यांच्या दुकानात दर दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे. नागरिक लिंबू शरबत, शीतपेये, आईस्क्रीम, ज्युस तसेच अन्य पेयांना पसंती देत आहेत.

शहाळ्याचे थंडपाणी अमृततुल्य

सध्या उष्णता वाढल्याने नको असलेले थंड पेय पिण्यापेक्षा शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी अमृत आहे. सध्या तापमानात बदल होत असल्याने कोल्ड्रिंगमुळे विपरीत परिणाम आरोग्यावर होत असतो. त्यामुळे सर्दी होणे, खोकला, ताप येणे आदी आजार वाढू लागले आहेत.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ सकाळची आहे. सकाळी नारळ पाणी पिल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते.

Goa News |Cold Drinks
Mahadayi Water Issue: म्हादईप्रश्‍नी सत्तरीत तीव्र जनआंदोलनाची गरज

उन्हात फिरताना काळजी घ्या

उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरणं, डोक्यावर टोपी घालणं किंवा रस्त्यांवर उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत अशा सूचना डॉक्टरांकडून करण्यात येत आहेत. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, अशक्तपणाबरोबर डोकेदुखी वाढल्याचं निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवलं जात आहे.

अशावेळी सातत्याने पाणी पित राहणं, लिंबू सरबत, कोकम अथवा फळांचा रस प्यावा, ताक, ओआरएस घ्यावं, असा सल्लाही डॉक्टर देतात. दुपारच्या वेळी भूक लागत असल्याने अनेकांना मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. परंतु उन्हात फिरून आल्यानंतर दुपारी मसालेदार पदार्थ खाल्ले, तर पोटाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते.

पिकांवरही परिणाम

कोणत्याही क्षेत्रातील तापमान वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. कधी-काधी वाऱ्याच्या प्रवाहाने तापमानात वाढ किंवा घट होते, काही वेळा विशिष्ट क्षेत्रात ढग अच्छादलेले असतात. त्यामुळेही तापमानात वाढ किंवा घट होत असते.

याचा परिणाम शेती आणि पिकांवरही होत आहे. आता काही ठिकाणी काजु, आंब्यावर फुले येण्यास सुरवात झाली आहे. मात्र, हवामानातील बदलामुळे ही पिके संकटात सापडण्याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com