Sanguem News: सांगेत भरपावसात टँकरद्वारे पाणी; लोक संतप्‍त

Sanguem Water Issue: पावसात उभे राहून टँकरचे पाणी भरण्‍याची वेळ लोकांवर
Sanguem Water Issue: पावसात उभे राहून टँकरचे पाणी भरण्‍याची वेळ लोकांवर
Sanguem Tanker Dainik Gomantak

भरपावसात सांगेच्या काही भागात गेले तीन दिवस पाणी नसल्‍यामुळे लोकांनी संताप व्‍यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेळपे येथे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असून तेथे दुसरी जलवाहिनी घालण्यासाठी पावसामुळे अडचणी येत आहेत. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्‍यात आला. पावसात उभे राहून टँकरचे पाणी भरण्‍याची वेळ लोकांवर आली.

आज सलग तिसऱ्या दिवशी सांगे भागात पाणीपुरवठा झाला नाही. नगरसेवक मेशू डिकॉस्‍टा यांनी आपल्या प्रभागातील जनतेची पाण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन खास टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला.

विहिरीतून जसे पाणी काढले जाते, त्याप्रमाणे इमारती राहणाऱ्या लोकांनी भांड्याला दोरी बांधून पाणी वर ओढून घेतले. पांगुणा, खैरीखाटे, पाजीमळ, भागातील नागरिकांना टँकरचे पाणी पुरविण्यात आले. उद्याही ही समस्या कायम राहिल्यास जनतेचे आणखी हाल होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com