Goa News: पाणी बिलाची रक्कम कमी करण्यासाठी लोकांची गर्दी

थकित पाणी बिलासाठी 31 जानेवारीपर्यंतची एकरकमी परतफेड तथा ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजना सार्वजनिक बांधकाम खात्याने राबविली.
Goa News |Water
Goa News |Water Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: थकित पाणी बिलासाठी 31 जानेवारीपर्यंतची एकरकमी परतफेड तथा ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजना सार्वजनिक बांधकाम खात्याने राबविली. परंतु पाणी बिले न मिळालेल्या किंवा इतर अनेक तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन खात्याने या योजनेची मुदत एक महिना वाढविण्याचे ठरविले आहे.

विशेष म्हणजे बिलाची रक्कम कमी करण्यासाठी ऑनलाईन सेवा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे ही रक्कम कमी होत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी बिलाची रक्कम कमी करण्यासाठी आज साबांखा कार्यालयात धाव घेतली होती.

Goa News |Water
Union Budget 2023: अर्थसंकल्पाकडून अपेक्षापूर्ती होणार?

राज्यात एकूण बिल थकबाकीदार 44 हजार ग्राहक आहेत आणि पाणी बिलाची थकित रक्कम 92 कोटी रुपये आहे, ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान साबांखापुढे आहे. थकबाकीदारांनी बिलाची रक्कम भरावी यासाठी खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी ओटीएस योजना डिसेंबर 2022 मध्ये जाहीर केली.

या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला. अनेक ग्राहकांच्या नावे वर्षभर न आलेल्या बिलाची रक्कम आणि मागील भरलेली रक्कम अशी एकत्रित रक्कम दाखवू लागली आहे. त्यामुळे ओटीएस योजनेखाली ही बिले आणण्यासाठी आणि नोंदविण्यासाठी अनेकांनी साबांखाच्या कार्यालयात धाव घेतली होती.

Goa News |Water
Mahadayi Water Dispute: शहाविरोधाचे नाटकच ! राज्य सरकारवर विरोधकांची सडकून टीका

पणजी शहर आणि परिसरातून सांतिनेज येथील साबांखा कार्यालयात सकाळपासून ओटीएस योजनेखाली बिले आणण्याकरिता ग्राहकांची ये-जा सुरू होती. त्यात महिन्याची शेवटची 31 तारीख असल्याने आणि योजना सुरू राहणार की बंद होणार, या भीतीने लोक बिले घेऊन कार्यालय गाठत होते.

ओटीएस योजनेखाली मंजूर होणारी बिलांची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याची सोय असल्याने अनेकांना ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्या सुविधांचा वापर करावा लागत होता. काहीजणांना ओटीएस योजनेखाली मंजूर झालेली रक्कम पाहून लिहून आणलेले धनादेशही माघारी न्यावे लागले.

28 फेब्रुवारीपर्यंत योजना

पाणी बिल ओटीएस योजनेची मुदत एक महिन्यांनी वाढविल्याविषयी साबांखाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नव्हती. परंतु ‘गोमन्तक’ला सूत्रांनी सांगितले की, ही योजना एक महिन्यांसाठी म्हणजेच फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्याविषयीची अधिकृत अधिसूचना 1 फेब्रुवारी रोजी काढली जाईल. साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनीही याला दुजोरा दिला आहे. जनतेने या मुदतीचा फायदा घेऊन बिलांची रक्कम अदा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com