गोव्यात पाण्यासाठी 'पाण्यात' घोषणा देत आंदोलन

बैलपार नदीतील पाणी इतरत्र नेण्यास विरोध
Protest for Bailpar River in goa
Protest for Bailpar River in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: बैलपार- कासारवर्णे येथील बैलपार नदीतील पाणी इतरत्र नेण्यास विरोध दर्शवण्यासाठी रविवारी ग्रामस्थांनी बैलपार नदीत उतरुन जल आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ‘आमचें उदक आमकां जाय, दिवचें ना रे, दिवचें ना, आमचें उदक दिवचें ना ,अशा घोषणा दिल्या. यावेळी आंदोलकांनी ‘शेतकरी एकता झिंदाबाद, पाणी वाचवा जीवन वाचवा, जलही जीवन अशाही दिल्या. आंदोलनात पुरुषांच्या बरोबरीने महिला व जेष्ठ नागरिकांनीही भाग घेतला होता. (Protest for Bailpar River in Goa)

Protest for Bailpar River in goa
गोव्यातील उच्चशिक्षित तरुणाची दूग्धव्यवसायातून बक्कळ कमाई

मोपा विमानतळ पंचक्रोशी पिडीत जन संघटनेचे निमंत्रक उदय महाले म्हणाले की, तिळारी प्रकल्पाद्वारे फक्त 40 टक्के पाणी सोडण्यात येते. त्यातीलच पाणी सिंधुदुर्गमध्ये वळवलेले आहे. तिळारीचे 100 टक्के पाणी हे बांधकाम सुरु अस्लेल्या या प्रकल्पाद्वारे बैलपार नदीचे पाणी खेचून मोपा विमानतळळासाठी देण्याचा घाट आहे. या प्रकल्पामळे आमचे गाव उध्वस्त होतील. पेडणे तालुक्यालाही त्याचा फायदा होणार नाही. नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Protest for Bailpar River in goa
'वास्को कदंब बसस्थानक प्रकल्प मार्गी लावणार'

तत्पूर्वी ॲड, प्रसाद शहापुरकर, भारत बागकर, भास्कर नारुलकर, बाबूराव गाड, रमाकांत तुळसकर, प्रियांका गाड, रेखा परब आदीनी आपले विचार मांडले. या आंदोलनात महेश तुळसकर,मेघशाम नाईक, संजय आरोलकर, विठू नाईक, विश्राम नाईक आदींनी भाग घेतला. यावेळी पेडणे पोलीस ठाण्याचे उप अधिक्षक सुदेश नाईक ,पोलीस निरीक्षक विक्रम नाईक हे पोलीस फौज फाट्यासह उपस्थित होते.

दुपारी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. या समस्येबाबत आमदारांनी संबधीत अधिकारी व संघटनेचे पदाधीकारी यांची बैठक बोलविणार असल्याचे सांगून त्यातून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. बैठकीत तोडगा मान्य झाला तर आंदोलन मागे घेण्यात येइल अन्यथा ते सुरु ठेवण्यात येइल, असेही आंदोलकांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com