Goa Ganesh Chaturthi 2023: ‘चार-रस्ता गणेशोत्सव’च्या ‘सीता-स्वयंवर’ला लोकांची पसंती

Goa Ganesh Chaturthi 2023: चार-रस्ता, काणकोण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्कृष्ट देखाव्याकरता प्रसिद्ध आहे.
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi 2023: काणकोणात दरवर्षी प्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक देखावे पाहण्यासाठी विविध भागातील लोक गर्दी करत आहेत

Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023: माटोळीतून साकारली आई लईराई देवीची देखणी प्रतिकृती

. यानिमित्ताने आजपासून दररोज विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चार-रस्ता, काणकोण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्कृष्ट देखाव्याकरता प्रसिद्ध आहे. यंदाही या ठिकाणी ‘सीता स्वयंवर’ हा सुंदर देखावा तयार केला आहे.

चाररस्ता काणकोणच्या मंडळातर्फे दि..२३ रोजी, सायंकाळी ७ वा. रॉकर्स ऑर्केस्ट्रा, दि.२४ रोजी, मेगा स्वर सांज हा संगीतमय कार्यक्रम होईल. दि.२५ रोजी, संध्याकाळी ७ वा‌. '' घोव आंकवार बायलां सांवांर'' हा कोकणी नाट्यप्रयोग सादर केला जाईल.

दि.२६ रोजी, ४ वा‌. ‘भावगीत गायन स्पर्धा’ होईल. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांकरता वेशभूषा व घुमट आरती स्पर्धा होईल. दि.२७ रोजी, १०.३० वा.देणगी कूपन निकाल, बक्षीस वितरण व ६ वा. श्रींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023
Comunidade: मुजोर अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

चावडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकोपयोगी कार्य अनेक वर्षांपासून करीत असून यंदाही गणेशोत्सव मंडपात रोज संध्याकाळी ७ वा.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि.२३ रोजी, ओमकार मेलोडीज ऑर्केस्ट्रा,

दि.२४ रोजी, ''होम मिनिस्टर'' हे कोकणी नाटक, दि.२५ रोजी, पॉपस्टार ऑर्केस्ट्रा, दि. २६ रोजी, ‘करीन ती पूर्व’ ७ वा. होईल. दि.२७ रोजी, दुपारी १ वा. महापूजा तीर्थ-प्रसाद व महाप्रसाद दि.२८ रोजी, सकाळी ११.३० वा.देणगी कूपन्स चा निकाल, संध्या. ६ वा. मिरवणुकीने श्रींचे विसर्जन होईल.

वडावळ गणेशोत्सवचा शिवरायांचा देखावा

वडामळ, श्रीस्थळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक देखावा बनविला आहे. दि.२३ रोजी, सायंकाळी ७ वा.''गोवन मेलोडीज '' हा ऑर्केस्ट्रा, दि.२४ नवशक्ती कला केंद्र, किंदळे-पणसुले यांच्यातर्फे ७ वा.''जिव्हाळा ''हे मराठी नाटक होईल.

दि. २५ रोजी, सायंकाळी ७ वा.‘हिरवा-चुडा’ नाटक होईल. दि.२६ रोजी, सायं. ७.३० वा. ‘आता माझी सटकली’ हे कोकणी नाटक आणि दि.२७ रोजी, दुपारी १२.३० वा. महापूजा, तीर्थ-प्रसाद ४ वा.देणगी कूपन निकाल, काणकोण तालुक्यातील शालांत परीक्षेत पहिल्या ३ क्रमांकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल.त्यानंतर संध्याकाळी पूजा मिरवणूकीने श्रींचे विसर्जन करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com