Mhadei River: ‘हा’ पिकनिक स्पॉट नव्हे! गांजेत म्हादई नदीवर आंघोळीस जाणे धोक्याचे; उसगाव पंचायत व फोंडा पोलिसांकडून फलक

Ganjem Mhadei River: गांजे येथील म्हादई नदीवर अंघोळीसाठी जाणाऱ्या लोकांचा बुडून मृत्यू होत असल्याच्या घटनांची दखल घेऊन उसगाव पंचायत व फोंडा पोलिसांनी परिसरात धोका दर्शविणारे फलक लावले आहे.
Ganjem Mhadei River
Ganjem Mhadei RiverDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गांजे येथील म्हादई नदीवर अंघोळीसाठी जाणाऱ्या लोकांचा बुडून मृत्यू होत असल्याच्या घटनांची दखल घेऊन उसगाव पंचायत व फोंडा पोलिसांनी परिसरात धोका दर्शविणारे फलक लावले आहे.

सरपंच रामनाथ डांगी यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ महिन्यात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बुडून होणाऱ्या मृत्यूंमुळे गावाला वाईट प्रसिद्धी मिळत असल्याने उसगावचे स्थानिक नाराज होते.  अशाप्रकारे बुडून होणाऱ्या मृत्यूंना प्रतिबंध करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

खबरदारीच्या उपाययोजनांसह गांजे नदीत बुडून होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यासाठी पोलिस,पंचायत आणि स्थानिक प्रयत्न करीत आहे.गांजे नदीत आंघोळीसाठी, पिकनिकसाठी प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन तसे फलक लावले आहेत.

Ganjem Mhadei River
Mhadei Wildlife: देवराईचं जंगल, पाण्याचे झरे आणि हजारो वर्षांचा वारसा 'म्हादईची देवराई', निसर्गसंपन्नतेचं देवतांकडून दिलेलं देणं

‘हा’ पिकनिक स्पॉट नव्हे!

नदीचा हा परिसर पिकनिक किंवा पर्यटन स्थळ नाही, शिवाय बेकायदेशीरपणे नदीत आंघोळ करण्यास येणाऱ्यांना वाचवण्यास जीवरक्षकही नाहीत. नदीत प्रवेश व बुडून मृत्यूंमुळे पंचायतीची बदनामी होऊ नये,म्हणून पावले उचलल्याचे सरपंच रामनाथ डांगी यांनी सांगितले.

Ganjem Mhadei River
Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

आनंद मुरगांवकर, स्थानिक रहिवासी

गांजे येथे म्हादई पात्रात पर्यटकांच्या बुडून मृत्यू होण्याच्या घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाय करणे गरजेचे होते. पोलिसांनी धोका दर्शविणारे फलक लावले आहेत. पंचायतीनेही चांगले पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com