Goa Water Problem: पाण्यासाठी जनता आक्रमक; शिवोली, सांताक्रुझमध्ये समस्या कायम

सत्तरीत टँकरद्वारे पुरवठा
Water Shortage
Water Shortage Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Water Problem: जानेवारीपासूनच जाणवत आहे. टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी पाण्याची मागणी वाढू लागली आहे. मार्च ते मे असे उन्हाळ्याचे तीन महिने अद्याप बाकी आहेत. त्यात राज्यातील उष्मा अधिक वाढत असल्याने पाण्याची मागणी अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाण्याचे नियोजन न जमल्यास लोकप्रतिनिधींना जनतेच्या असंतोषाला सामोरे जावे लागण्याची भीती नाकारता येणार नाही. बार्देश तालुक्यातील शिवोली मतदारसंघात वागातोर, शापोरा येथे काही भागांत नळाचा पाणी पुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी आमदार दिलायला लोबो यांना जाब विचारला.

दोन वर्षांपासून येथे पाणीटंचाई जाणवत आहे. रास्ता रोको करूनही परिस्थिती जैसे थे आहे. साबांखाकडे एकच टँकर असल्याने तो कोठे पोहोचणार, असा येथील जनतेचा सवाल आहे.

Water Shortage
Goa Fire News: सांताक्रुझमधील पोर्तुगीजकालीन बंद घराला आग; लाखो रूपयांचे नुकसान

येथील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पाण्याचे टँकर पाठविला जाईल, असे सांगितले. पाण्याच्या टँकरसाठी येथील लोकांचा व्हॉट्सग्रुप करावा, ज्या भागात पाणी हवे आहे, त्यांनी मागणी करावी, अशी सूचना याप्रसंगी आमदारांच्या वतीने करण्यात आली.

याशिवाय तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझ मतदारसंघातील अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी कायम आहे.

तालुकानिहाय स्थिती

 सत्तरी तालुक्यात अनेक गावांमध्ये दररोज किंवा दोन-तीन दिवसांनी टॅंकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो. काही भाग डोंगरमाथ्यावर येत असल्याने तेथे जलवाहिनीचे पाणी पोहोचत नाही.

 डिचोली तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या तेवढी गंभीर नसली, तरी काही गावांची तहान पूर्णपणे भागत नाही. दुसऱ्या बाजूने जुन्या झालेल्या मुख्य जलवाहिन्या फुटल्या आणि जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड झाल्यानंतर बहुतेक भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होऊन समस्या निर्माण होण्याचे प्रकार घडत असतात.

Water Shortage
Goa Assembly Winter Session: अधिवेशनाचा दिवस केला कमी; विरोधक संतापले

काणकोण तालुक्यातील प्रामुख्याने गावडोंगरी व खोतीगावातील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्‍न अद्याप कायम आहे. जलवाहिनचे काम कधी पूर्ण होणार याकडे या गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

पेडणे तालुक्यातील उर्मलबाग वाडा, कांचोळे वाडा, दाभोलकर वाडा, मर्डी-गावडे वाडा या भागातील महिलांनी रस्त्यावर उतरत पाणी प्रश्‍न सोडवा अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

दर महिन्याला आम्ही पाण्याचे बिल वेळेवर भरतो. परंतु हल्ली पाणी मिळत नसतानाही बिले दिली जातात, अशी तक्रार येथील महिलांची आहे.

साबांखाकडे टँकरची कमतरता

सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोठ्या प्रमाणात टँकर नाहीत, परंतु खासगी टँकरद्वारे ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, त्याठिकाणी ते पोहोचविले जाते. निश्‍चितपणे राज्यात किती टँकरने पाणीपुरवठा होतो, ही आकडेवारी तत्काळ सांगता येणार नाही.

- नीलेश काब्राल, मंत्री, साबांखा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com