गोव्यात ‘पीईक’ क्रॅनिओप्लास्टी

व्हिजन हॉस्पिटलमध्ये (Vision Hospital) यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली.
‘PEK’ cranioplasty in Goa
‘PEK’ cranioplasty in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

व्हिजन हॉस्पिटलमध्ये (Vision Hospital) एका रुग्णावर ‘पीईक’ ( Poly ether ketone) क्रॅनिओप्लास्टी इम्प्लांट करण्यात आले आहे. गोव्यातील ही पहिलीच यशस्वी शस्रक्रिया असल्याची माहिती ‘व्हिजन’ हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रकांत शेट्ये (Dr. Chandrakant Shetty) यांनी दिली.

एका 34 वर्षांच्या पुरुष रुग्णाचा एव्हीएम फाटल्यामुळे मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानंतर संपूर्ण बरे होण्यासाठी प्रदीर्घ वेळ लागणार होता. तीन वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या कवटीच्या दोषाची पुनर्बांधणी केली होती. कवटीचा हा दोष किंवा विकृती मेंदूला आकस्मिक आघात आणि आपत्तीजनक परिणामास संवेदनाक्षम बनवते.

‘PEK’ cranioplasty in Goa
कष्टकरी भूमिपुत्रांसाठी गोवा राज्य नवनिर्माण आघाडी

व्हिजन हॉस्पिटलचे डॉ. व्ही. एन. जिंदाल आणि त्यांच्या टीमसाठी पहिल्या शस्त्रक्रियेनंतर तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कवटीच्या पुनर्बांधणीचा विचार करणे, ही एक आव्हानात्मक कामगिरी होती, ज्यामध्ये गठ्ठा बाहेर काढून हाडांचे विघटन करण्यात आले. हाडांच्या ऊतींची अनुपलब्धता लक्षात घेता, हाडांच्या दोषावर विशेष कवटीच्या टोप्या बसविण्याची योजना होती. या कवटीच्या टोप्या विविध प्रकारच्या सामग्रीच्या उपलब्ध आहेत. त्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी होण्याचे फायदे आहेत.

गोव्यात अशा प्रकारची पहिली खास ‘पीईक’ (पॉली इथर केटोन) क्रॅनिओप्लास्टी इम्प्लांट (कवटीची टोपी) रुग्णासाठी बनवण्यात आली. व्हिजन हॉस्पिटल, म्हापसा येथे ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अशा प्रक्रियेमुळे मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होते आणि कवटीच्या दोषामुळे मेंदूला आघात होण्याचा धोका टाळता येतो.

न्यूरोसर्जन डॉ. व्ही. एन. जिंदाल आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. यामध्ये भूलतज्ज्ञ डॉ. भाग्यश्री शेट्ये, ॲनेस्थेसिया टेक्निशियन मख्तुम, सिस्टर सोनम, अपूर्वा आणि सीमा यांचा समावेश होता, अशी माहिती डॉ. शेट्ये यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com