Goa Theft: गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ! म्हापसा, पर्वरी, थिवी, कोलवाळ परिसरात 7 घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

Goa Theft Crime: राज्‍यात चोऱ्यांचे सत्र थांबले असे वाटते तोवर उत्तर गोव्‍यात चोरट्यांनी सात फ्‍लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. शिवाय लहान-मोठे चोरीचे प्रकारही घडले.
Goa Theft
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

म्‍हापसा: राज्‍यात चोऱ्यांचे सत्र थांबले असे वाटते तोवर उत्तर गोव्‍यात चोरट्यांनी सात फ्‍लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. शिवाय लहान-मोठे चोरीचे प्रकारही घडले

पेडे-म्हापसा येथील एका संकुलातील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुवर्णालंकार व चांदीचे दागिने मिळून सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

ही घटना २३ जानेवारी रोजी घडली. उपलब्ध माहितीनुसार, वैभव गावडे आणि वैदिक श्रीवास्तव यांच्या मालकीच्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये ही चोरीची घटना २३ रोजी पहाटे २ ते ४ या वेळेत घडली. चोरट्यांनी फ्लॅटचे मुख्य दरवाजे उघडून आतमध्ये प्रवेश केला. या चोरीबाबत, शेजाऱ्यांनी मालकांना सकाळी आडेआठच्या सुमारास कळवले.

त्यानंतर, त्‍या दिवशी दुपारी म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. वैभव गावडे हे बाहेरगावी फिरण्यास गेले होते. तर वैदिक श्रीवास्तव हा बिट्स पिलानीचा विद्यार्थी आहे. आठवड्यातून एकदा वैदिक हा पेडे येथे फ्लॅटवर यायचा. गावडे यांच्या फ्लॅटमधून १२ लाख किमतीचे दागिने तर वैदिक श्रीवास्तव यांच्या फ्लॅटमधून ३० ते ४० लाख रुपयांचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी रेकी करून संधी साधली.

गणेशपुरी-म्‍हापसा दरोड्याचा तपास अजून नाही

संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली असून, ती शेजारील राज्यात पाठवण्यात आली आहेत. या चोरीच्या घटनेला चार दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. घाणेकरांच्या बंगल्यावर ऑक्टोबर २०२५ मध्ये सशस्त्र दरोडा पडला होता. तेव्हा बुरखाधारी चोरट्यांनी लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. हे दरोडेखोर अजून पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते.

थिवीतही दोन बंगल्‍यांमध्‍ये ‘हात की सफाई’

माडेल-थिवी येथील फाज हाऊसिंग कॉलनीत एका रात्री दोन बंगल्यांमध्ये चोरी झाली. बंगल्यांचे मालक बाळकृष्णन मेलीविट्टी हे निवृत्त साहाय्यक अभियंता असून, त्यांनी दोन दिवसापूर्वी लग्न समारंभासाठी केरळला प्रवास केला होता.

घर रिकामे असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्‍या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. याच रात्री कॉलनीत सुनील बागायतकर यांच्या बंद बंगल्यातसुद्धा चोरट्यांनी डल्ला मारला. मात्र मालक मुंबईत असल्याने नेमक्‍या कोणत्‍या वस्तूंची चोरी झाली याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही.

कोलवाळ, डिचोली येथेही साधला डाव

तोवरवाडा-कोलवाळ येथील सावियो पॉल यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून चोरांनी २० लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. फिर्यादी पॉल कुटूंब हे १५ जानेवारी रोजी सांयकाळी घर बंद करून नातेवाईकांकडे गेले.

अधिक तपास सुरू आहे. दरम्‍यान, साष्टीवाडा, बोर्डे-डिचोली येथे ‘मातृछाया’ या वाहनांच्या स्पेअर पार्ट दुकानात आज दुपारी चोरी झाली. आतील रोकड लंपास करण्‍या आली असून अधिक तपास सुरू आहे.

पर्वरीतही दोन बंद फ्‍लॅटमध्‍ये चोरी

पर्वरीतील ‘देवश्री ग्रीन’ इमारतीतील किरण म्हांबरे यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यात दीड लाख रुपये रोख रक्कम तर साडेचार लाखांच्‍या सोन्‍या-चांदीच्या नाण्‍यांचा समावेश आहे.

घटनेवेळी म्हांबरे कुटुंब हे मुंबईला गेले होते. तिथून परतल्यावर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत जोसवाडो-सुकूर येथेही चोरीची घटना घडली असून आज २७ रोजी ती उघडकीस आली. फिर्यादी हेरंब कुटुंब हे घर बंद करून दुसऱ्या ठिकाणी गेले होते.

Goa Theft
Comba Theft: आधी रेकी केली, एकट्या महिलेला हेरून शिरला घरात! गळ्याला चाकू लावून केली चोरी; तामिळनाडूच्या एकाला अटक

पत्ता विचारताना मंगळसूत्र पळवले

म्हार्दोळ भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवण्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला. संबंधित

महिला आपल्या घरासमोर उभी असताना दुचाकीस्वार तिच्या समोर पत्ता विचारण्याच्या निमित्ताने आला आणि दुचाकीच्या मागे बसलेल्या एकाने या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची माळ खेचली. अचानक झालेल्या या हल्ल्याने ही महिला रस्त्यावर फेकली गेली.

Goa Theft
Goa Theft: 'ती' कार कुणाची? गूढ वाढले; वेर्णा, नुवे, पर्रा चोरी प्रकरणांत एकच गाडी सीसीटीव्‍हीत कैद, पोलिसांसमोर आव्‍हान

सोनसाखळ्‍या हिसकावणारा पाटणे येथे जेरबंद

पाटणे येथे रस्‍त्‍यावरून चालत जात असताना नोवा सोवास्तुकी या इस्त्रायली महिलेच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या खेचून पोबारा करणारा आनंद चलवादी (मूळ कर्नाटक) याच्‍या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्‍या. ती आपल्या भाड्याच्या खोलीकडे जात होती. त्‍यावेळी पिवळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान करून आलेल्‍या दुचाकीस्‍वाराने सोनसाखळ्‍या खेचल्‍या असे तिने तक्रारीत नमूद केले होते. या दोन्‍ही सोनसाखळ्‍यांची किंमत सुमारे १.३५ लाख रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com