Peddem Indoor Stadium: पेडे स्टेडियमच्या छताचे सिलिंग कोसळले! आमदार कार्लुस फेरेरांची सरकारवर टीका

Peddem Mapusa indoor stadium: या घटनेची माहिती मिळताच, हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी घटनास्थळी धाव घेत स्थितीचा आढावा घेतला. तसेच घडलेल्या प्रकारावर फेरेरा यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
Peddem Mapusa indoor stadium
Peddem Mapusa indoor stadiumDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियमच्या छताचे सिलिंग कोसळण्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१९) उघडकीस आली. या घटनेवेळी तेथे कोणी हजर नसल्याने, मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच, हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी घटनास्थळी धाव घेत स्थितीचा आढावा घेतला. तसेच घडलेल्या प्रकारावर फेरेरा यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

Peddem Mapusa indoor stadium
Goa Rain: 'तिलारी' धोकादायक पातळीवर! पूर, पडझड, वाहतुकीची कोंडी! गोव्यात पावसाचा धुमाकूळ

सोमवारी सायंकाळी उशिरा पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. फेरेरा यांनी या घटनेसाठी सरकारला जबाबदार धरण्याची मागणी केली. या घटनेची चौकशी व्हावी व सिलिंगची पुनर्बांधणी करावी. या घटनेमागे कंत्राटदाराची चूक असेल तर ती कंत्राटदाराच्या खर्चाने भरून काढावी. जर कंत्राटदाराची चूक नसल्यास, यामागे कोण जबाबदार हे तपासावे, असेही फेरेरा म्हणाले.

Peddem Mapusa indoor stadium
Mumbai Heavy Rain: रस्ते पाण्याखाली, लोकल बंद, विमानसेवा विस्कळीत... देशाची 'आर्थिक राजधानी' तुंबली, पूरसदृश परिस्थितीने नागरिक हैराण Watch Video

राष्ट्रीय स्पर्धेवेळी या ठिकाणी नूतनीकरण झाले होते. असे असताना, कमी कालावधीत अशी घटना घडते व सिलिंग कोसळते, याचाच अर्थ या कामाचा दर्जा निकृष्ट होता. क्रीडा संचालक अजय गावडे यांनी या स्टेडियमला भेट देऊन, ही घटना घडण्याला कोण जबाबदार आहे ते सांगावे.

- कार्लुस फेरेरा, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com