'मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचा पगार द्या नाही तर मंत्रिपद सोडा'

मुरगाव पालिका (Margao Municipal Council) कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास होत नसेल तर नगर विकास मंत्री मिलिंद नाईक तसेच वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे.
Goa Pradesh Congress Committee
Goa Pradesh Congress CommitteeDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास होत नसेल तर नगर विकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) तसेच वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी आपल्या पदावरून पायउतार व्हावे. येणाऱ्या दोन दिवसात पालिका कर्मचार्यांना पगार वितरित केला नाही तर कर्मचाऱ्या बरोबर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेस समिती अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान (Nazir Khan) यांनी सांगितले.

वास्को काँग्रेस गट समितीतर्फे हॉटेल सुप्रीम मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, सैफुल्ला खान,उलारीको राॅड्रीगीस व साजिद खान उपस्थित होते. मुरगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचा पगार अजून हातात पडला नसल्याने त्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. त्यांच्या समोर रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. याविषयी वास्को काँग्रेस गट समितीने सरकार विरोधात आवाज उठविला. गोवा प्रदेश काँग्रेस समिती अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी याविषयी आवाज उठविताना सरकारकडे विकास कामासाठी अमाप पैसा आहे. मात्र आपल्या शहरातील कचरा गोळा करणाऱ्या,घाण साफ करणाऱ्या कामगारांना पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मुरगाव नगरपालिका हि अ दर्जाची पालिका असून पालिका तिजोरीत खडखडाट निर्माण होणे म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. पालिकेला 54 कोटी रुपये थकबाकी येणे आहे.ती थकबाकी वसुली करण्यास पालिका सबसे लपशी ठरली आहे. वास्कोत मोठमोठ्या कंपन्या असतात आपणाकडून थकबाकी वसुली केली तर कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न आपोआप सुटणार आहे. मात्र तसे होत नाही.

Goa Pradesh Congress Committee
Goa Police Constable Recruitment: 10,459 जागांसाठी अनुभवी उमेदवारांना संधी

तसेच पालिकेला येणारा ऑक्ट्रॉय गेल्या चार वर्षापासून बंद आहे. तो सरकारने पुन्हा द्यावा असे त्याने सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी साठी वेतन मिळाले नाही त्याने दिवाळी कशीबशी साजरी केली. मुरगाव तालुक्यात चार आमदार आहेत. यात दोन मंत्री आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन पालिका कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सोडवणे क्रमप्राप्त आहे. पण तसे होत नाही. चारही आमदार भाजपचेच आहेत. मुख्यमंत्री तुमचाच आहे. त्यांच्याशी बोलणी करून कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी त्यांनी मागणी केली. आमदार फक्त एकमेकावर ताशेरे ओढण्यात व्यस्त आहेत.

काँग्रेसचे नंदादीप राऊत (Nandadeep Raut) यांनी बोलताना पालिका कर्मचाऱ्यांना वेतन न मिळणे याला सरकार जबाबदार आहे. सरकारने पालिकेचा ऑक्ट्रॉय बंद केला. तो परत चालू करावा. सरकार या कामी काहीच मदत करत नाही. सरकार फक्त आश्वासन देत आहे.तसेच सरकार फक्त ढोल ताशे वाजवायला व्यस्त आहे. वास्को अजूनही विकास कामात बॅकफूटवर आहे.याला सरकार जबाबदार आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही कर्मचाऱ्या बरोबर रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खान व यांनी आपले विचार मांडून सरकारला धारेवर धरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com