Goa Daily News Wrap: गुन्हे, क्रीडा, राजकीय व इफ्फी संबधित घडमोडींचा आढावा, वाचा एका क्लिकवर...

Goa Breaking News 25 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच महत्वाच्या शहरातील ब्रेकिंग न्यूज
Goa Breaking News 25 November 2023 | Goa Breaking News
Goa Breaking News 25 November 2023 | Goa Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on

33 धावांनी पराभव करत तमिळनाडूची गोव्यावर मात

केव्ही सिद्धार्थ (६१) व स्नेहल कवठणकर (५५) यांच्या अर्धशतकांनंतरही विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात गोव्याचा तमिळनाडूविरुद्ध ३३ धावांनी पराभव. तमिळनाडूच्या बी. साई सुदर्शन (१२५) याचे शतक.

गोव्यात ED ची मोठी कारवाई;

जमीन हडप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यात मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून राज्यात बेकायदेशीरपणे जमीन संपादित करणाऱ्या लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत 31 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

सर्कल रेटनुसार एकूण 39.24 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने 25 नोव्हेंबरच्या एका निवेदनात म्हटले आहे.

ड्रग डेस्टिनेशन ठरलेल्या गोव्यासाठी NCB ची जबाबदारी वाढली; महाराष्ट्र, कर्नाटकातील 2 जिल्ह्यांचा झोनमध्ये समावेश

गोव्यात मागील दोन वर्षात अमली पदार्थ प्रकरणी 21 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 47 जणांना अटक करण्यात आली. यात 34 भारतीय आहेत तर उर्वरीत आंतरराष्ट्रीय संशयित आहेत.

गृह मंत्रालयाने याची दखल घेऊन गोव्यातील अमली पदार्थ नियंत्रण संस्था (NCB) कार्यालयाचे उप-क्षेत्रातून विभागीय क्षेत्रात रुपांतर केले आहे.

कुडचडे येथे अपघातात दोघेजण गंभीर जखमी

काकूमोड्डी, कुडचडे येथे दुचाकी व कारमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जाहमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत दारुण पराभवासह गोव्याच्या मुली माघारी

सलग पाचव्या लढतीतील दारुण पराभवासह गोव्याच्या मुलींची १५ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेतील मोहीम शनिवारी संपली. महाराष्ट्राविरुद्ध डाव २६ धावांत गारद झाल्यामुळे १० विकेटने हार स्वीकारावी लागली.

आमदार वीरेश बोरकर यांच्या भावावर गुन्हा दाखल

रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांच्या भावावर महिलेवर अत्याचार आणि पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. त्यांच्यावर महिलेच्या घरात घुसून घराचा दरवाजा तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाची 'इफ्फी'त एंट्री! लाइट्स अन् स्क्रीन्स झाल्या बंद....

परतलेल्या मॉन्सूनने पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही काल रात्री (24 नोव्हेबर) पावसाने एंट्री केली आणि सर्वांची धावपळ सुरू झाली. एरव्ही सजावट आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटात न्हाऊन निघालेला इफ्फी परिसर पावसामुळे अचानकच शांत होऊन गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com