Patto Bridge: दुरुस्तीच्या कारणास्तव पाटो पूल काहीकाळ राहणार बंद; उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Patto Bridge Temporary Closed: उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी IAS स्नेहा गिते यांनी पाटो पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पणजीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुलाचा रस्ता तात्पुरता बंद करण्याची सूचना जारी केली आहे
Patto Bridge Temporary Closed: उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी IAS स्नेहा गिते यांनी पाटो पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पणजीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुलाचा रस्ता तात्पुरता बंद करण्याची सूचना जारी केली आहे
Patto Bridge Temporary ClosedDainik Gomantak
Published on
Updated on

Patto Bridge, Panjim Goa

पणजी: पणजीतील पाटो पुलावर सुरु असलेल्या बांधकामामुळे बुधवारी (दि. 6 नोव्हेंबर) रोजी वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला. केवळ सामान्य नागरिकच नाही तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील पाटो पणजी येथील पुलावर काहीकाळ अडकले होते.

पणजीत पाटो पूल हा शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे. इथे सतत वाहनांची रहदारी सुरूच असते आणि नव्या पाटो पुलाच्या जोडणीच्या ठिकाणी असलेल्या लोखंडी प्लेट उखडल्यामुळे इथे वाहतूक कोंडी झाली होती.

पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्यावर घालण्यात आलेली लोखंडी प्लेट काढण्यात आली होती. हे काम फक्त रात्रीच करण्यात येते. दुरुस्तीच्या भागावरील लोखंडी प्लेट पुन्हा घालण्यास सकाळी उशीर झाला, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली.

image-fallback
Patto Bridge Panjim: पणजीतील पाटो पुलावर वाहतूक कोंडी; पुलाच्या कामामुळे मुख्यमंत्री देखील खोळंबले

काल (दि.6 नोव्हेंबर) यामुळेच वाहनांची भलीमोठी रंग थेट कदंबा बसस्टॅण्ड पर्यंत लागली होती आणि दुपारपासून सुरु झालेला हा खोळंबा जवळपास संध्याकाळ पर्यंत सुव्यवस्थित झाला नव्हता. वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आता हे काम पुढील काही दिवस रात्रीच्यावेळी केले जाणार आहे.

6 ते 10 पटो पूल बंद!

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी IAS स्नेहा गिते यांनी पाटो पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पणजीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुलाचा रस्ता तात्पुरता बंद करण्याची सूचना जारी केली आहे.

तसेच आता खराब झालेल्या विस्तारीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आणि पुलाच्या बेअरिंगला लुब्रीकंट घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत आणि याच आदेशांनुसार 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत हा मार्ग ठराविक वेळेत वाहतुकीसाठी बंद असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Kushavati district
Goa Traffic Jam
Patto Panaji drunk tourists
Patto Bridge traffic violations
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com