Goa: पत्रादेवी चेकनाके धोकादायक; ना गेट ना शौचालय

गोव्यातील (Goa) पत्रादेवी चेक नाक्यावर गेट नसल्याने वाहनेही सुसाट पळवली जातात. चेकनाके दुर्घटनेला आमंत्रण देत आहे.
Goa: पत्रादेवी चेकनाका
Goa: पत्रादेवी चेकनाकाDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: गोव्यातील (Goa) पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 64 येथे पत्रादेवी बांदा चेकनाका अंत्यत धोकादायक स्थितीत असून या ठिकाणी प्रवाशाना कोणत्याच प्रकारच्या मुतारी शौचालय सोय नाहीच शिवाय या नाक्यावर गेट नसल्याने वाहनेही सुसाट पळवली जातात. चेकनाके दुर्घटनेला आमंत्रण देत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी केली आहे. (Patradevi Banda Check Post at National Highway 64 in Pernem taluka is in very dangerous condition)

पत्रादेवी येथे अबकारी चेक नाका राष्ट्रीय महामार्गावर आहे , तिची स्थिती अत्यंत भयानक स्थितीत आहे, सरकारला या अबकारी खात्याकडून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो , मात्र त्या ठिकाणी अबकारी अधिकारी कर्मचारी रात्रंदिन सेवा बजावत असताना आपला जीव धोक्यात घालत असतात. पत्र्याचा आसरा घेत हे कर्मचारी काम करतात मात्र त्याठिकाणी आत बाहेर जाण्यासाठी रोखणारी गेट नसल्याने नाक्यावरून अनेक वाहने सुसाट वेगाने पळण्याची शक्यता आहे. या नाक्यावर काम करणाऱ्या किंवा प्रवाश्याना वाहने चेक करण्याच्या बहाण्याने थांबवले जातात त्याना मुतारी शौचालय याची सोय नाही.

Goa: पत्रादेवी चेकनाका
Goa: पत्रादेवी चेकनाकाDainik Gomantak
Goa: पत्रादेवी चेकनाका
Goa : पक्क्या रस्त्यासाठी धडपडतोय धनगर समाजबांधव

त्यामुळे पुरुष मंडळी रस्त्याच्या बाजूला आपली सोय करू शकतात मात्र महिलांचे काय , त्याच्या सोई साठी सरकारने त्वरित या ठिकाणी मोबाईल सौचालयाची सोय करावी अशी मागणी राजन कोरगावकर यांनी केली. पत्रादेवी चेकनाक्यावर पोलीस , आरटीवो व अबकारी हे तीन नाके आहेत त्यातल्या त्यात अबकारी नाका म्हणजे जीवघेणा आसरा ठरत आहे , एखाद्यावेळी भरघाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने ठोकर दिली तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे .

सध्या कोरोना काळात तालुक्यातील किरणपाणी-आरोंदा , न्हयबाग-सातार्डा आणि पत्रादेवी –बांदा असे तीन नाक्या पैकी पत्रादेवी नाका सर्व वाहतुकीसाठी खुला आहे ,मात्र इतर दोन्हीही नाके पूर्णपणे बंद आहेत , त्यावरून दोन्ही नाक्यावर येणारी व जाणारी वाहने हि याच पत्रादेवी नाक्यावरून येतात त्यामुळे वाहनांची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागते . मग प्रवासी म्हणा किंवा वाहनचालक , क्लीनर याना खूप वेळ थांबावे लागते . त्याना याठिकाणी कसल्याच सोईसुविधा उपलब्ध नाहीत.

Goa: पत्रादेवी चेकनाका
Goa: पत्रादेवी चेकनाकाDainik Gomantak

पत्रादेवी चेक नाक्यावर सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे . त्यामुळे रस्ता धोकादायक स्थितीत आहे . या नाक्यावर वाहने भरगाव वेगाने येतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीच गेट नाही , वाहन थेट प्रवेश करू शकते .त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही.

Goa: पत्रादेवी चेकनाका
Goa: झुआरी उड्डाणपुलाचे लवकरच उद्‍घाटन

भव्य प्रवेशद्वार उभारणार ; चेरमेन सोपटे

पत्रादेवी राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तिन्ही विभागांना एकाच छताखाली आणण्याची योजना आहे , शिवाय या ठिकाणी भव्य स्वागत कमान उभारण्यात येईल अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी दिली , गोवा पर्यटन विकास महामंडळा तर्फे हि योजना कार्यरत होणार आहे .

जीव घेणा प्रकार थांबवा ; राजन कोरगावकर

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी माहिती देताना . पत्रादेवी चेक नाक्यावरील स्थिती भयानक आहे , एका बाजूने रस्त्याचे खोदकाम ., दुसऱ्या बाजूने वाहने रोखण्यासाठी गेट नाही , शिवाय प्रवाशाना कसल्याच प्रकारच्या नैसर्गिक विधी करण्याच्या सोयी नाही , आणि अबकारी नाका आहे तो अत्यंत धोकादायक स्थितीत आहे . मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे . या भागाची पाहणी केली असता जास्त करून अबकारी विभागाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात . या ठिकाणी एखाद्यावेळी भरगाव वेगाने वाहन आले आणि नाक्यावर धडकले तर मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती राजन कोरगावकर यांनी व्यक्त केली .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com