Pernem News : पेडण्यात प्रत्येक रस्त्याच्या बाजूला उभारणार पथदीप : आर्लेकर

Pernem News : सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्यातून प्रत्येक रस्त्याच्या बाजूला पथदीप बसवून अंधार दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक जनतेने आणि पंचायत मंडळांनी आपापल्या परिसरातील विकासकामांना प्राधान्य देताना सहकार्य करावे.
Pernem
Pernem Dainik Gomantak
Published on
Updated on

Pernem News :

मोरजी, पेडणे मतदारसंघातील प्रमुख आणि अंतर्गत गावागावांत जाणाऱ्या रस्त्यांवर जर पथदीप नसेल तर तो परिसर अंधारमय असतो याची दखल घेऊन सरकारच्या माध्यमातून सर्व रस्त्यांवर आवश्यकतेनुसार पथदीप उभारून परिसर प्रकाशमान करण्याची योजना असल्याचे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी खुटवळ परिसरात नवीन पथदीप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करताना केले.

यावेळी हळर्णचे सरपंच मयूर परब, माजी सरपंच दिव्या नाईक, पंच विनोद हरिजन, रामचंद्र परब, सिद्धी राऊळ, शैलेश नाईक आदी उपस्थित होते. आमदार आर्लेकर पुढे म्हणाले, की मतदारसंघातील प्रत्येक रस्ता प्रकाशमान व्हायला हवा. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्यातून प्रत्येक रस्त्याच्या बाजूला पथदीप बसवून अंधार दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक जनतेने आणि पंचायत मंडळांनी आपापल्या परिसरातील विकासकामांना प्राधान्य देताना सहकार्य करावे.

यापूर्वी पेडणे मतदारसंघातील समस्या कोणीही प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. बेरोजगारी हा विषय गंभीर आहे, परंतु सर्वांना सरकारी नोकऱ्या मिळणे शक्य नसल्याने प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे ज्या ज्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Pernem
Summer In Goa: राज्यात उष्णतेचा पारा वाढला, उकाड्याने जनता हैराण शीतपेयांना मागणी

मोपा विमानतळ प्रल्पातून अनेक रोजगार उपलब्ध झालेले आहेत, त्याचा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

सरपंच मयूर परब यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सहकार्यातून खुटवळ ते बैलपारपर्यंतच्या मुख्य रस्त्याला पथदीप उभारण्यात येत आहेत आणि याचे श्रेय आमदार प्रवीण आर्लेकर जाते, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com