Summer In Goa: राज्यात उष्णतेचा पारा वाढला, उकाड्याने जनता हैराण शीतपेयांना मागणी

Summer In Goa: शीतपेयांना मागणी वाढली: आईसक्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची गर्दी
Summer In Goa
Summer In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Summer In Goa:

राज्यात यावर्षी उष्णतेचा पारा वाढल्याने यंदा शीतपेयांना चांगले दिवस आले असून, शीतपेयांना मागणीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकाला थंड आणि शीतल गारवा हवाहवासा वाटत असून, त्यामुळे प्रत्येकाची पावले शीतपेयांचे गाडे, दुकानांसह आइस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.

डिचोली शहरासह विविध भागात गेल्या काही दिवसांपासून असेच चित्र दिसून येत आहे. बदलत्या हवामानामुळे गेल्या दोन दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्याने तर कहरच केला आहे. सध्या तापमानाचा पारा 34-35 अंश सेल्सियसहून अधिक आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर उकाडा असह्य झाला आहे.

अंगाची लाही-लाही होत असून, अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. साहजिकच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गेल्या दोन दिवसात शीतपेयांची दुकाने आणि आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी उसळत आहे. बहूतेकजण लिंबू सोडा, लस्सी, शहाळ्याचे पाणी याला अधिक पसंती देत आहेत. गेल्या जवळपास महिन्याहून अधिक काळापासून उष्णतेच्या पाऱ्यामध्ये चढउतार होत आहे.

Summer In Goa
Goa Fire News: भाटलेत गोदामाला आग; फर्निचर साहित्याचे नुकसान

शीतपेयांचा भाव वाढला

उष्णतेमुळे मागणी असल्याने शीतपेयांचा भावही यंदा वाढला आहे. 25 ते 30 रुपये ग्लास याप्रमाणे दर लिंबू सोडाचे दर आहेत. शहाळी 40 ते 50 रुपये या दराने विकण्यात येत आहेत. लस्सी, ज्यूस, शेक, आइस्क्रीम यांचेही दर 5 ते दहा रुपयांनी वाढले आहेत.

तरीदेखील उकाडा असह्य झाला, की शीतपेयांची दुकाने 'फूल्ल' होत आहेत. रस्त्यालगतच्या गाड्यांसमोरही गर्दी दिसून येत आहे. गेल्या जवळपास महिन्यापासून आपल्या गाड्यावर ग्राहकांची गर्दी होत आहे.

Summer In Goa
Goa Drug Case: ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी इराणी नागरिकाला अटक...

असे मये तलावावरील एक लिंबू सोडा विक्रेता ज्ञानेश्वर सरमळकर यांनी सांगितले. लिंबू सोडाला मागणी असली, तरी लिंबू महाग झाले आहेत. त्यामुळे लिंबू सोडाचे सध्याचे परवडत नाहीत. तरीदेखील पर्याय नाही. असे सुवर्णा गोवेकर या विक्रेतीने सांगितले.

शीतपेय घेताना काळजी घ्यावी

उकाड्यावर मात करण्यासाठी शीतपेय आणि आइस्क्रीम पदार्थांना प्रचंड मागणी असली, तरी शीतपेय किंवा आइस्क्रीम खाताना प्रत्येकाने काळजी घ्यावी. असे जाणकारांचे मत आहे. उष्माघात वाढला, की लींबू सोडा, शहाळ्याचे पाणी, लस्सी, दही अधिक उपयुक्त असल्याचे जाणकारांचे मत आहे. वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही जाणकारांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com