Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Pernem News : या रस्त्यांवर आजही खोदकाम सुरू असून त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. हे रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी होतील की नाही, असा सवाल स्थानिक सरपंच व नागरिक करीत आहेत.
Pernem
Pernem Dainik Gomantak

Pernem News :

मोरजी, पेडणे तालुक्यातील रस्त्यांची स्थिती बघितल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते किती जागृत आहे, हे लक्षात येते. तालुक्यातील अनेक रस्ते धोकादायक स्थितीत आहेत. काही रस्ते गुळगुळीत झाले आहेत.

या रस्त्यांवर आजही खोदकाम सुरू असून त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. हे रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी होतील की नाही, असा सवाल स्थानिक सरपंच व नागरिक करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्यामुळे सरकारला विकास कामे करताना अडचणी येत आहेत. आचारसंहितेपूर्वी विकास कामे सुरू झाली होती. ती कामे मात्र सुरू आहेत. परंतु अजूनही जे रस्ते खोदलेले आहेत, ते तसेच आहेत. या रस्त्यांकडे सरकार कधी लक्ष देईल, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कारण खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

यासंदर्भात, माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम खात्याने अगोदर रस्ते गुळगुळीत करणे आवश्यक आहे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांना विश्वासात घेऊन रस्त्यांचे खोदकाम करावे, ज्या पद्धतीने भूमिगत केबलसाठी रस्त्याचे खोदकाम केले आहे. ते पूर्ण झाल्यानंतरही रस्ते तसेच आहेत. दुसऱ्या बाजूने आता जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ही जलवाहिनी टाकल्यानंतर या रस्त्यांचे हॉटमिक्स होणार की नाही, असा प्रश्न आहे.

Pernem
Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

आधी डांबरीकरण करा

भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्त्याचं खोदकाम केले होते. त्या ठिकाणी अजूनपर्यंत डांबरीकरण केलेले नाही. आधी डांबरीकरण करावे नंतरच जलवाहिनी टाकण्यासाठी काम हाती घ्यावे. अन्यथा हे काम रोखले जाईल, असा इशारा माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर आणि सरपंच अजय कलंगुटकर यांनी दिला होता.

त्यानंतर कंत्राटदाराने जिथे वीज केबल घालून रस्ता खोदकाम केले होते, तिथे डांबरीकरण सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूने जलवाहिनीचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी पूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी अजय कलंगुटकर यांनी केली आहे.

मांद्रे मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी सरकारकडून शंभर टक्के सहकार्य मिळत आहे. काही रस्त्यांवर अजून खड्डे आहेत. ते पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे बुजून ते व्यवस्थित केले जाईल. काही कंत्राटदार वेळेवर काम करत नसल्यामुळे कामांना दिरंगाई होत आहे. नागरिकांनाही सहकार्य करावे.

- जीत आरोलकर, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com