Sattari : पर्येत 24 कोटींच्या 15 एमएलडी राॅ वाॅटर पंपिंग स्टेशनला मंजुरी

पर्ये मतदार संघातील जनतेसाठी हा महत्वाचा प्रकल्प : आमदार डाॅ. दिव्या राणे
15 MLD Raw Water Pumping Station
15 MLD Raw Water Pumping StationDainik Gomantak
Published on
Updated on

15 MLD Raw Water Pumping Station : पर्ये मतदार संघात दिवसेंदिवस पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागली आहे. ही समस्या कायमची सुटण्यासाठी आता पर्ये आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी पुढाकार घेतला आहे.

तब्बल 24 कोटी खर्चून केरी, पर्ये, मोर्ले, पिसुर्ले, होंडा आणि भिरोंडा पंचायतीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मोर्ले पुर्नवसन काॅलनी येथे डब्लूटीपी साठी 15 एमएलडी राॅ वाॅटर पंपिंग स्टेशन बांधण्याच्या प्रकल्पाला मंजूरी जलसंसाधन खात्यातर्फे नुकतीच देण्यात आली आहे.

15 MLD Raw Water Pumping Station
Old Mandovi Bridge : जुन्या मांडवी पुलावर चार वाहनांचा अपघात

सदर प्रकल्प मंजूर झाल्याची माहिती पर्ये मतदार संघाच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी दिली आहे.

या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जलसंधारण मंत्री सुभाष शिरोडकर, ज्यांनी पर्येच्या लोकांच्या वतीने डाॅ. राणे यांनी केलेली विनंती मान्य व्हावी यासाठी वैयक्तिक रस घेतला. त्यामुळे डाॅ. दिव्या राणे यांनी त्यांचे खास आभार मानले आहे.

15 MLD Raw Water Pumping Station
दुचाकी चालकासमोर अचानक आली 3 फूटी मगर; मुंबई-गोवा महामार्गावर मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन, पहा व्हिडीओ

यावेळी बोलताना आमदार डाॅ. दिव्या राणे म्हणाल्या, सत्तरीच्या लोकांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पाणी सर्वांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प गरजेचा होता.

मी नागरिकांच्या हिताचा विचार करत आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता टप्याटप्याने केली जात आहे. 24 कोटींचा हा पाणी प्रकल्प आहे. त्यामुळे पर्ये मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. पुढच्या वर्षी लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे.

सत्तरीत अनेक विकास कामे मार्गी लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात विविध विकास कामे मंजुरी मिळाल्यानंतर सुरु केली जातील तसेच जी कामे हाती घेतलेली आहे ती सुध्दा टप्याटप्याने पुर्ण केली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

सत्तरी ही आमची असुन सत्तरीच्या विकासाला चालना देणे व त्याला गती देण्यासाठी लागणारे सोपस्कार वेळेवर पुर्ण केले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com