Pernem News : हरमल पंचायत क्षेत्रातील पार्सेकरवाडा बंधाऱ्याची स्थिती धोकादायक

शेतकऱ्यांत चिंता : माजी सरपंच केरकर यांच्याकडून दुरुस्तीची मागणी
Pernem News
Pernem NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पंचायत क्षेत्रातील प्रभाग 9 मधील पार्सेकरवाडा येथील पदपूलकम बंधाऱ्याची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. तरी बंधाऱ्यावरील पदपुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केली आहे. दरम्यान, हा पदपूल बंधारायुक्त असल्याने टिकून आहे. साधारणपणे सात-आठ छोट्या खांबांवर हा पदपूल उभा आहे. हे खांब नसते तर या बंधाऱ्याची काहीच धडगत नव्हती, असे बांधकामसंबंधित एका युवकाने सांगितले.

या पदपुलाच्या स्थितीचा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित करून माजी सरपंच केरकर यांनी लक्ष वेधून घेतले होते व ठराव मंजूर केला होता. या पदपुलाची उभारणी ३०-३५ वर्षांपूर्वीची असून साधारणपणे २०-२२ मीटर लांबी आहे. हा पूल सध्या कमकुवत बनला आहे.

पुलाच्या तळाशी असलेले सिमेंट कोसळत असून लोखंड पूर्णत: गंजलेल्या व काही तुटलेल्या स्थितीत दिसत असल्याने पावसाळ्यात व नंतर, त्याची स्थिती कशी असेल याची चिंता असल्याचे मत माजी सरपंच केरकर यांनी व्यक्त केली. ग्रामसभेत ठराव संमत केला असून, पुढील सोपस्कार जलदगतीने करण्याची मागणी केरकर यांनी केली आहे.

Pernem News
Tea-Biscuit Side Effects: सकाळी उठल्यावर तुम्हीही चहा-बिस्किट खाता? मग त्याचे तोटे एकदा वाचाच

या प्रभागाच्या पंचसदस्य रजनी इब्रामपूरकर यांनी ठरावाला पाठिंबा दिला होता. या बंधाऱ्याची स्थिती पाहून शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तरी या भागाचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे चेअरमन जीत आरोलकर यांनी शेतकऱ्यांच्या सुविधांचा विचार करून पुलाची उभारणी बंधारायुक्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Pernem News
Stray Dogs : फोंड्यात भटक्या कुत्र्यांची दहशत; महिन्याकाठी सव्वाशे लोकांना कुत्र्यांचा चावा!

फक्त पैशांची उधळपट्टी ः अलीकडे सरकारी कामांचा आढावा घेतल्यास पैशांची उधळपट्टीच दिसून येते. किती वर्षांत पूल मोडकळीस यावा व किती प्रमाणात लोखंड, खडी, रेती, सिमेंट आदींचे मिश्रण असावे व तळातील लोखंडाचे मोजमाप करण्यात हयगय होत असल्याने तळाचे लोखंड दिसू लागते व सरकारी काम धोक्यात येते. सरकारी कामाचे ऑडिट होणे आवश्यक असून विकासकामांवर ६० टक्के निधी खर्च होत असतो. यावरून काम किती दर्जाचे होईल याचा अंदाज येतो.

Pernem News
Goa Weather Update : वरूणराजाचा लपाछपीचा खेळ; अल निनो, वादळ कारणीभूत

या ओहोळावर बंधारा कम पदपूल असून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना त्याचा खूपच फायदा होतो. साधारणपणे एक किलोमीटर परिघात शेटकरवाड्यापर्यंतच्या भागातील विहिरींची स्थिती समाधानकारक असते. शिवाय शेतकऱ्यांना दुबार शेती लागवडीसाठी लाभदायी ठरते. त्यामुळे येथे नवीन उभारण्यात येणारा पदपूल बंधारायुक्त असावा.

रामचंद्र केरकर, माजी सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com