

मोरजी : एकेकाळी मोठ्या शहरांत भरणारा मजुरांचा बाजार आता ग्रामीण भागातील प्रमुख नाक्यांवर भरताना दिसत आहे. सध्या पार्से-आगरवाडा जंक्शन येथे भरणारा मजुरांचा बाजार वाहतुकीसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. दररोज सकाळी येथे मोठ्या प्रमाणात मजूर गोळा होतात. बांधकामे, शेती वा अन्य कामांसाठी कंत्राटदार येथे येऊन या मजुरांना घेऊन जातात.
त्यामुळे सकाळच्या वेळी या परिसरात मोठा गोंधळ असतो. सध्या राज्यात श्रमाची कामे करण्यासाठी माणसे मिळत नसल्याने या मजुरांना मोठी मागणी आहे. त्यामुळे त्यांचा भाव वाढला आहे. काही मजूर अव्वाच्या सव्वा मजुरी मागत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.
दरम्यान, सकाळी पार्से-आगरवाडा जंक्शन परिसरात जमा होणारे हे मजूर रस्त्यालगत तसेच काही वेळा रस्त्याच्या मधोमध उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचा धोका मोठा आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिस प्रशासनाने आणि स्थानिक यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच मजुरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोल्हे यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.