Scholarship : गरजूंना देणार शिष्यवृत्तीची रक्कम एनजीओ देणगीच्या रूपात देण्याचा निर्णय

विद्यार्थी ‘पारस’चा अनुकरणीय निर्णय ः ‘प्रज्ञाशोध’मध्ये ८९ टक्के गुण प्राप्त
Amount
AmountDainik Gomantak
Published on
Updated on

Scholarship : सरकारी प्राथमिक विद्यालय वेलिंग - म्हार्दोळ या शाळेचा विद्यार्थी कु. पारस देवानंद वेलिंगकर याने चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केली असून या शिष्यवृत्तीची रक्कम स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) देणगीच्या रूपात देण्याचा निर्णय त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

एससीईआरटी पर्वरी तर्फे एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत कुमार पारस याने ८९ टक्के गुण मिळवून फोंडा तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला असून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण खात्यातर्फे त्याला दरवर्षी शिष्यवृत्तीच्या रूपात रक्कम मिळणार आहे.

Amount
Pernem News : कुठल्याही क्षेत्रात सहकार्य ठरते महत्त्वपूर्ण : प्रसाद लोलयेकर

सलग सहा वर्षी मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीची रक्कम तो एनजीओला देणार आहे, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सदर रक्कम उपयुक्त ठरेल. एवढ्याशा वयात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्याच्या मनातील दातृत्वाची जाणीव पाहता खरोखरच हा विद्यार्थी गुणवंत व प्रज्ञावंत ठरला आहे. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये असा त्याचा मानस आहे. कुटुंबीयांनी या निर्णयाचे या शिक्षिका , पीटीए तसेच ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले आहे.

Amount
Pernem News - पेडणे येथे मोटारसायकल पायलटांची शेडची मागणी | Gomantak TV

पारसचा इतरांनीही घ्यावा आदर्श !

कु. पारस हा या विद्यालयाचा अत्यंत हुशार विद्यार्थी असून तो शिक्षणाबरोबरच क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही तरबेज आहे. प्रज्ञाशोध परीक्षेसाठी ललिता हेलबे, विणा नाईक , दिव्या नाईक या शिक्षिकांचे तसेच पालकांचे त्याला बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. अशा या सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्याने दाखवलेली समाजाप्रती आपुलकी व दातृत्वाची भावना ही सर्वांनाच थक्क करणारी अशीच आहे. त्याच्या या कृतीचा इतरांनी आदर्श घ्यावा,अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com