Kelbai Gajlaxmi idol: वाळवंटी नदीत सापडलेली ‘ती’ मूर्ती 1000 नाही 20 वर्षांपूर्वीची! मूर्तिकार पुट्टास्वामींचा दावा

Kelbai Gajlaxmi idol: केळबाय गजलक्ष्मीची मूर्ती १ हजार वर्षांपूर्वीची नसून २० वर्षांपूर्वीची आहे. ती मूर्ती आम्हीच घडवली होती, असे ख्यातनाम मूर्तिकार गुडिगार पुट्टास्वामी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
Valvanti River Murti
Kelbai Devi Puratan IdolDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्ये येथील वाळवंटी नदीत सापडलेली केळबाय गजलक्ष्मीची मूर्ती १ हजार वर्षांपूर्वीची नसून २० वर्षांपूर्वीची आहे. ती मूर्ती आम्हीच घडवली होती, असे ख्यातनाम मूर्तिकार गुडिगार पुट्टास्वामी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

ते म्हणाले, आम्ही आमच्या वेर्णा येथील ‘शिल्पलोक’मध्ये अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. काही वेळा पुजारी मूर्तीचे विसर्जन करण्यास सांगतात किंवा मूर्तीत काही व्यंग येते, त्यामुळे तिचे विसर्जन केले जाते.

याही बाबतीत मूर्तीचे विसर्जन केले गेले असावे. राजेंद्र केरकर यांनी उल्लेख केलेली दगडी गजलक्ष्मी (गजांत लक्ष्मी) ही फार प्राचीन नाही. आमच्या वेर्णा येथील ‘शिल्पलोक’ संस्थेत सुमारे वीस वर्षांपूर्वी अशीच मूर्ती तयार केली होती. या मूर्तीत गजलक्ष्मी सुलेभासनात बसलेली असून पाठीमागील दोन हातांत कमळ (पद्म) आहे, तर समोरील हात अभय मुद्रा आणि वरद मुद्रा धारण केलेले आहेत.

Valvanti River Murti
Kelbai Goddess Statue: अद्भुत! पर्येतील वाळवंटी नदीत आढळली 'केळबाय देवी'ची कदंब राजवटीतील पुरातन मूर्ती

मूर्तीच्या शिरोभागी कीर्तीमुख असून दोन्ही बाजूस कलश धारण केलेले हत्ती आहेत. आम्ही गोव्यात अनेक केळबाईच्या मूर्ती देखील घडवल्या आहेत. गजलक्ष्मीची सर्वात पहिली मूर्ती सांची स्तूपात, जो बौद्धकालीन स्मारक आहे, इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात आढळते, असे त्यांनी सांगितले.

Valvanti River Murti
Kelbai Goddess: हणजुणे धरणाच्या निर्मितीनंतर गाव जलाशयाखाली बुडाला, कदंबकालीन गुळ्ळेची 'केळबाय'

मूर्तीचा कालखंड शोधण्यासाठी दोन पद्धती वापरात आणतात. एक म्हणजे त्याविषयीचा शिलालेख किंवा मूर्तीची शैल चिकीत्सा (स्टायलिस्टीक डेटींग). या मूर्तीचा विचार केल्यास हातात कमळ व मुकूट हे होयसाळा शैलीतील आहेत. त्यांचा कालखंड १२-१३ व्या शतकातील असून त्यांचा गोव्याशी संबंध नाही. मूर्तीची प्रभावळ नायक कालखंडातील आहे. त्यांचा कालखंड १६-१७ व्या शतकातील तर हत्तींची पिळ दिलेली सोंड ही कॅलेंडर शैलीतील आहे. त्यामुळे ती मूर्ती निःसंशयपणे अलिकडच्या काळातील आहे.

- प्रा. रोहित फळगावकर, इतिहास अभ्यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com