Sattari News : सत्तरीवासीयांच्या प्रेमाने दिव्या राणे भावूक

Sattari News : वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव : वाळपईतील कार्यालयात शेकडो कार्यकर्ते, हितचिंतकांनी घेतली भेट
Mla Deviya Rane
Mla Deviya Rane Dainik Gomantak

Sattari News :

वाळपई, पर्येच्या आमदार तथा सत्तरीवासीयांच्या लाडक्या भाभी डॉ. दिव्या राणे यांचा वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा झाला. प्रत्यक्ष भेटून तसेच विविध माध्यमांतून त्यांचे कार्यकर्ते व चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

सत्तरीवासीयांचे हे प्रेम बघून दिव्या राणेही भावूक झाल्याचे यावेळी दिसून आले. डॉ. प्रमोद सावंत यांनीही कुळण-साखळी येथे भेट देऊन डॉ. दिव्या राणे यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळच्या सत्रात आमदार डॉ. दिव्या राणे यांनी कुळण, साखळी येथे निवासस्थानी देवघरातील देवाचे तसेच आपले सासरे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी प्रतापसिंग राणे यांनी आपल्या सुनेला केक भरवून शुभेच्छा दिल्या. सत्तरीतील काही कार्यकर्ते व जनतेनेही कुळण येथे त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी विठ्ठलापूर, साखळी येथील विठ्ठल मंदिरात आपल्या कुलदैवतेचे दर्शन घेतले.

Mla Deviya Rane
Goa Politics: 'पंतप्रधानांनी संविधानाची हत्या केली, तारीख, वेळ ठरवा मी चर्चेला तयार'; विरियातोंचे मोदींना 'ओपन चॅलेंज'

तसेच पर्ये येथील भूमिका मंदिर व म्हालसा मंदिरात भेट देऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर वाळपई येथील कार्यालयात सत्तरीतील जनतेकडून त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. आमदार झाल्यानंतर सार्वजनिकरित्या पहिल्यांदा डॉ. दिव्या राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या उपस्थितीत केक कापून तसेच केक भरवून त्यांचा वाढदिवस साजरा झाला. अनेकांनी सकाळपासून रांगेत थांबून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी काहींनी फोटो, सेल्फीही घेतल्या. महिला, युवकांची मोठी गर्दी होती. सत्तरीतील पंच, सरपंच तसेच विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी व इतरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

माझ्यासाठी संस्मरणीय दिवस...

दिव्या राणेंना शुभेच्छा देण्यासाठी सत्तरीतील कानाकोपऱ्यातून लोक आले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुमारे दहा हजाराच्यावर नागरिकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यात ज्येष्ठ महिला, सेल्फ हेल्प ग्रुपच्या सदस्या आदींची मोठी उपस्थिती होती. सत्तरीच्या जनतेने दिलेले भरभरून प्रेम बघून दिव्या राणेही भारावल्या.

भेटी देणाऱ्या प्रत्येकाची त्या आस्थेने विचारपूस करत होत्या. संध्याकाळी समारोप कार्यक्रमावेळी त्या अधिक भावूक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाले की, जनतेचे हे प्रेम व आपुलकी पाहून आपण भारावून गेले आहे. हा दिवस माझ्यासाठी स्मरणीय आहे.

अनेकांच्या शुभेच्छा

बुधवार रात्रीपासून आमदार डॉ. दिव्या राणे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्रातील अनेकांनी फोनवरून तसेच इतर माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, खासदार श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे, भाजपचे सर्व आमदार, मंत्री व इतरांचा समावेश होता.

सत्तरीवासीय व कुटुंबामुळे घडले...

आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या की, सकाळपासून अनेकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व लोकांचे प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. अवघ्या काही वर्षांत सत्तरीने मला खूप काही दिले.

सर्वांचा आशीर्वाद व पाठिंब्यामुळेच आपण आमदार झाले. यात आपले कुटुंब, सासू सासरे, पती, दोन्ही मुली, नणंद, आपले आई वडील तसेच मित्रपरिवार व चाहते यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास व पाठिंब्यामुळे आज मी इथपर्यंत पोचू शकले. मला सत्तरीसाठी खूप काही करायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com