Valpoi News : फणसपोळी, पापड, चिप्ससाठी चला सत्तरीत! प्रक्रिया उद्योग सुरू

Valpoi News : महिला वर्ग व्यवसायात व्यस्त, उपक्रमातून अर्थप्राप्ती शक्य
Valpoi
ValpoiDainik Gomantak

Valpoi News :

वाळपई, सत्तरी तालुक्यात कच्चा फणसापासून पापड, रसाळ फणसापासून पोळी, फणसाचे चिप्स, निरफणसाचे पापड, तांदळाचे, कोहाळ्याचे, साबुदाण्याचे सांडगे बनविले जातात. यंदा या व्यवसायाला गतीप्राप्त झाली असून महिलावर्ग या कामात व्यस्त आहे.

या घरगुती उद्योगामुळे काही प्रमाणात महिलावर्गाला रोजगारही मिळत आहे. अल्पप्रमाणात अर्थप्राप्ती होत आहे. ग्रामीण भागात घरगुती खाण्यासाठी पापड, सांडगे बनविण्याची कामे सुरु आहेत. घरगुती खाण्यासाठी कच्या फणसाचे पापड बनविण्याची कामे सुरु आहेत. अशा प्रक्रियायुक्त पदार्थांची चव पावसाळ्यात देखील चाखण्यास मिळते.

दररोज सकाळी फणस काढून त्यातील कच्चे गरे वेगळे करतात. गरातील बी (भिंगट) वेगळी करुन फणसाच्या पात्याही वेगळ्या करुन ठेवतात. असे निव्वळ वेचलेले गरे हाताने किंवा विळीने किंवा यंत्राव्दारे लहान करतात. नंतर हे गरे पारंपारिक पध्दतीने चुलीच्या आगीवर भांड्यात गरे व त्यात पाणी मिश्रीत करुन शिजवतात. हे शिजवलेले गरे मिक्सरमध्ये वाटून पेस्ट केली जाते.

या फणस पेस्टमध्ये हिंग, मीठ, जीरे, मिरची घालून एकजीव केले जाते. अशी तयार पेस्ट प्लास्टीक पेपर किंवा केळीच्या पानावर पातळ सारविली जाते. त्यावेळी खोबरेल तेलाचा वापर सारविताना केला जातो.

असे सारविलेली फणसाची पेस्ट उन्हात सुकविण्यासाठी ठेवली जाते. सायंकाळी उन्हातून वाळविल्यानंतर पापड तयार होतात. त्या पापडांना चौकोनी किंवा गोलाकार आकार देऊन कापले जाते. घरात खाण्यासाठी किंवा काही प्रमाणात विक्री करण्यासाठी असे पापड तयार केले जात आहेत.

Valpoi
Goa Film City Project : लोलयेत ‘फिल्म सिटी’ला थारा देऊ नका; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

रूचकर पदार्थ

कोहाळ्यापासून देखील सांडगे बनविले जात आहेत. फणस पापड, पोळी बरोबरच तळलेले गरे म्हणजेच चिप्स तयार केले जातात. उन्हाळी हंगामात प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जात आहेत. धावे येथील मंगल माटणेकर म्हणाल्या, आम्ही घरगुती खाण्यासाठी फणस पापड करतो. कच्चा फणसापासून विविध पदार्थ बनविले जातात. हे पदार्थ खाण्यासाठी अगदी रुचकर असून पावसाळ्यात या पदार्थांची चव अप्रतिम असते. त्यामुळे हे पदार्थ पावसाळ्यात खूप उपयोग ठरतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com