Panjim: 'स्मार्ट' पणजी बनतेय 'स्पा सिटी', सर्वसामान्य महिलांना शहरात फिरणं कठीण - दत्तप्रसाद नाईक

Panjim city news: राजधानी पणजी ही मिरामार समुद्रकिनारा, श्री महालक्ष्मी मंदिर, मारुतीगड आदी स्थळांसाठी प्रसिद्ध होती.
Panjim
PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानी पणजी ही मिरामार समुद्रकिनारा, श्री महालक्ष्मी मंदिर, मारुतीगड आदी स्थळांसाठी प्रसिद्ध होती; परंतु आता महानगरपालिका पणजीला ‘स्मार्ट सिटी’ करण्याऐवजी ‘स्पा सिटी’ बनविण्यात व्यस्त झाली असून सर्वसामान्य महिलांना शहरात फिरणे कठीण होत आहे, असा आरोप दत्तप्रसाद नाईक यांनी केला.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत दत्तप्रसाद नाईक बोलत होते. यावेळी नगरसेवक जॉयल आंद्राद, नरेश च्यारी उपस्थित होते. दरम्यान, नाईक म्हणाले की, सध्या पणजीत सुमारे ३० स्पा आहेत. पणजीतील मुख्य रस्ता असलेल्या १८ जून रोडवरच ७ स्पा आहेत. यापूर्वी आम्हाला किनारी भागातच हे स्पा, मसाज पार्लर चालायचे; परंतु आता राजधानीतदेखील त्यांना परवानगी देण्यात येत असून स्थानिक आमदार आपली जबाबदारी झटकत आहेत. यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी.

पणजीत एवढ्या मोठ्या प्रमाणात जे स्पा आलेले आहेत त्यांमध्ये नेमके काय चालते? अवैध प्रकार तर घडत नाहीत ना? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

मागील दोन-तीन वर्षांत स्पांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर महापौरांनी यांना परवानगी दिली नसती तर हे घडलेच नसते. आतातरी पणजीकरांनी जागरूक होऊन येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत चांगल्या प्रतिनिधींना संधी द्यावी, असे आवाहनही दत्तप्रसाद नाईक यांनी केले.

Panjim
Goa Film Industry: कोकणी सिनेमा बनवायचा झाल्यास 'कोटी' रुपये गोव्यातील निर्माता कोठून आणेल?

दरम्यान, ताळगाव मतदारसंघातील दहाही प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार देणार असून नागरिकांनी त्यांना मतदान करावे. ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या बदलायच्या असतील तर बदल घडविणे गरजेचे असल्याचे नाईक यांनी सांगितले.

‘स्पा’विषयी महापालिकेलाच विचारा!

राजधानी पणजीत जे काही स्पा येत आहेत, त्याबाबत माझ्याऐवजी तुम्ही महानगरपालिकेलाच प्रश्‍न विचारा, याविषयावरून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात असल्याचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

Panjim
Goa Politics: गोव्यात 'व्यापम'पेक्षा मोठा घोटाळा! 'त्या' मंत्र्याला त्वरित हाकलून लावा; काँग्रेस मागणीवर ठाम

बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात हे पणजीचे महापौर असल्याने तसेच त्यांच्याच नेतृत्वाखाली पणजी महानगरपालिकेचे पॅनल निवडून आल्याने त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही, असे दत्तप्रसाद नाईक म्हणाले.

पणजीत वाढत चाललेल्या ‘स्पा’ सेंटरबाबत मी यापूर्वीच बोललो आहे. पणजी शहर आता ‘स्पा सिटी’ बनत चालली आहे. दसऱ्याच्या शुभदिनीच शहरात तीन नवीन ‘स्पा’ सेंटर सुरू करण्यात आली, ही गोष्टच शहराच्या अधोगतीचे प्रतीक आहे.

पणजीच्या हिताची, संस्कृतीची, प्रतिष्ठेची काळजी घेणारे नेतृत्व आता उरलेले नाही, हे यातून स्पष्ट दिसते. ‘मी या गोष्टीला कारणीभूत नाही,’ असे सांगून पणजीचे आमदार स्वतःच शहराच्या बदलत्या चेहऱ्यापासून आपले हात झटकताना दिसतात. - उत्पल पर्रीकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com