Panjim Smart City: ‘स्मार्ट’ रस्त्यांचे काम संथगतीने

साल्वादोर दी सोल हॉटेल ते नॅशनल थिएटर रस्ता ‘जैसे थे’
Panajim Smart City
Panajim Smart CityGomantak Digital Team

Panjim Smart City : राजधानीतील साल्वादोर दी सोल ते नॅशनल थिएटरपर्यंतचा रस्ता स्मार्ट करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. परंतु, हे काम संथगतीने चालू आहे.

एका बाजूला, 15 जूनपर्यंत स्मार्ट सिटीची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी दुसरीकडे, रस्त्याचे काम का रखडावले आहे, असा सवाल नागरिक करीत आहेत.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) यावर्षी केंद्राकडून आलेला निधी परत जाऊ नये म्हणून रस्त्यांच्या कामाला सुरूवात केली.

काही ठिकाणी युनिव्हर्सल तर काही ठिकाणी स्मार्ट रस्ते करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यातील बालभवन ते अग्निशामक दलापर्यंतचा रस्ता तयार झाला आहे.

Panajim Smart City
Somvar: सोमवारी चुकूनही करू नका 'हे' काम, जाणून घ्या या दिवसाशी संबंधित नियम

तर इंटरनॅशनल थिएटर ते मलनिस्सारण प्रकल्पपर्यंतचा रस्ता पूर्णत्वाकडे आहे. त्याशिवाय काकुलो मॉल ते थॉमस गॅरेजपर्यंतचा, तसेच सरस्वती इमारत ते टीजीएसबी बँकेपर्यंत, तसेच साल्वादोर दी सोल हॉटेल ते नॅशनल थिएटरपर्यंतच्या रस्त्याचे काम थांबलेले आहे. दुसरीकडे, आता उद्योग भवनासमोर मोठा चर काढून गटार बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Panajim Smart City
What Next After 10th: विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीचाही विचार व्हावा !

संजीत रॉड्रिग्स यांनीच लक्ष घालावे

शहरातील साल्वादोर दी सोल हॉटेल ते नॅशनल थिएटर रस्ता सतत वर्दळीचा असतो. मध्यवर्ती ठिकाणी असल्याने हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्याशिवाय याठिकाणी वाहने पार्किंग करण्याची सुविधा होती, आता हा रस्ता स्मार्ट केला जात आहे.

परंतु हे स्मार्ट रस्त्याचे काम का संथगतीने सुरू आहे. या कामाला गती कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘आयपीएससीडीएल’ची जबाबदारी आता संजीत रॉड्रिग्स यांच्याकडे असल्याने कदाचित त्यांच्या पाहणीदौऱ्यानंतरच कामांना गती येईल, असे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com