Panjim Municipality: आयुक्तांच्या बदलीची महापालिकेत चर्चा

काही महिने सेवानिवृत्तीचे बाकी असताना आयुक्तांची बदली झाली की घडवून आणली याविषयी अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत.
Panjim Municipality
Panjim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Municipality: पणजी आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांची झालेली बदली सध्या महापालिकेत चर्चेचा विषय ठरला आहे. इन-मीन काही महिने सेवानिवृत्तीचे बाकी असताना आयुक्तांची बदली झाली की घडवून आणली याविषयी अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत.

महापालिकेत गतवर्षी बहुमताने सत्ता आल्यानंतर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आग्नेल यांना महापालिकेत आयुक्त म्हणून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे आजही सांगितले जाते. परंतु अचानक त्यांच्या झालेल्या बदलीचे नक्की कारण काय? याचा शोध सध्या जो तो आपल्या परीने घेत आहे.

कार्निव्हल, अर्थसंकल्प तोंडावर असताना आग्नेल यांना येथून हटविण्यात आले आहे. आयुक्त, मुख्य अभियंता आणि लेखा अधिकारी अशी त्रिमूर्ती महापालिकेत एकजुटीने काम करीत होते.

ही एकजूटच काही जणांना खुपली आणि त्याचा परिपाक आग्नेल यांच्या बदलीमध्ये झाल्याचे येथील सूत्रांचे म्हणणे आहे.

Panjim Municipality
Goa Railway: दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पाला विरोध; भूसंपादनाबाबत न्यायालयात याचिका दाखल

आयुक्त आग्नेल यांनी महापालिका कामाची घडी बसवली होती. आग्नेल यांची बदली मिरामार कार्यालय रोखू शकले असते.

परंतु त्यांच्याविषयी काही नगरसेवकांनी अगोदरच मंत्र्याकडे कान फुंकले होते अशी माहिती पुढे आली आहे. असो पण आणखी काही दिवस बदलीची चर्चा होत राहणार हे स्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com