Panjim Municipal Council: महापालिकेची उद्या बैठक; भाडेकरारसह विविध मुद्दे चर्चेत

Panaji Municipality: चार महिन्यानंतर बैठक होणार असल्याने त्यामुळे बैठकीत बोलणारे नगरसेवक कोणते मुद्दे मांडतात ते पहावे लागेल
Panaji Municipality: चार महिन्यानंतर बैठक होणार असल्याने त्यामुळे बैठकीत बोलणारे नगरसेवक कोणते मुद्दे मांडतात ते पहावे लागेल
CCP Panjim Municipal Council Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महानगरपालिकेची येत्या ६ तारखेला (मंगळवारी) सायंकाळी ४ वा. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. चार महिन्यांच्या कालावधीनंतर होणाऱ्या या बैठकीत नॅशनल थिएटर, मार्केट भाडेकरार, मिरामार पदपूल आणि स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अजूनही साचणाऱ्या पाण्याचा विषय गाजण्याची शक्यता आहे.

चार महिन्यानंतर बैठक होणार असल्याने त्यामुळे बैठकीत बोलणारे नगरसेवक कोणते मुद्दे मांडतात, ते पहावे लागेल. नॅशनल थिएटरचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे काहीजणांची हात ओले करण्याची संधी हुकली आहे. त्यामुळे थिएटरच्या जागेचा पूर्ण मालकी ताबा महानगरपालिकेकडे आल्याने त्याठिकाणी व्यावसायिक कॉम्पलेक्स बांधायचे की आणखी काय, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Panaji Municipality: चार महिन्यानंतर बैठक होणार असल्याने त्यामुळे बैठकीत बोलणारे नगरसेवक कोणते मुद्दे मांडतात ते पहावे लागेल
Panjim Municipal Council: समिती सक्रिय होताच मार्केटची झाली स्वच्छता

याचबरोबर अनेक वर्षे रखडलेला मार्केट कराराचा विषय ऐनवेळी चर्चेला येऊ शकतो. मार्केटवरील उडालेले पत्रे, अस्वच्छता, मार्केटमधील समिती सदस्याला विक्रेत्याने केलेली मारहाण, झाड पडून युवतीचा झालेला मृत्यू, महापालिकेचे रखडलेले स्थलांतर,असे सर्व विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेत यापूर्वी तावातावाने बोलणारे सुरेंद्र फुर्तादो यांनी अलिकडे नमती भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून कितपत काही विषय मांडले जातात, त्याचबरोबर उदय मडकईकर, ज्योएल आंद्रादे, निल्सन काब्राल हे कितपत आपली भूमिका चोख पार पाडतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com