Goa Travel Guide Panaji: पणजीत कुठं फिराल, काय पहाल? राहण्या, खाण्याची संपूर्ण माहिती; वाचा राजधानीचा ट्रॅव्हल गाईड

Places to visit in Panjim: प्रत्येक कोपरा एक कथा सांगतो आणि कदाचित म्हणून ही गोव्याची राजधानी आहे
Panjim tourism
Panjim tourismDainik Gomantak
Published on
Updated on

Must-Visit Places & Travel Tips for Exploring Goa’s Capital

पणजी म्हणजे केवळ आधुनिकता आणि समुद्रकिनारे नाही, पणजी म्हणजे फक्त गोव्याची राजधानी नाही. या सहाराच्या अरुंद गल्ल्यांमधून फिरताना, जुन्या पोर्तुगीज घरांची रचना पाहताना, आणि स्थानिक लोकांच्या गप्पा ऐकताना, एक वेगळाच अनुभव मिळतो. हे शहर म्हणजे जुन्या आणि नव्याचा एक सुंदर मिलाफ आहे, जिथे प्रत्येक कोपरा एक कथा सांगतो आणि कदाचित म्हणून ही गोव्याची राजधानी आहे.

निसर्गाच्या कुशीत शांतता

पणजी म्हटलं की इथे शांत ठिकाणं असतील का असा प्रश्नच पडतो पण पणजीच्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. मारुती मंदिरापासून दिसणारा पणजी शहराचा विहंगम देखावा मनाला शांतता देतो, तर मांडवी नदीच्या किनाऱ्यावर बसून शांततेत वेळ घालवणं एक वेगळाच आनंद देतं. चोडण बेटावरील खारफुटीची सफर गोव्याच्या जैवविविधतेचा अनुभव देते, तर दीवार आणि चोडण बेटांवर फेरीने प्रवास केल्यास समुद्रकिनाऱ्यांपेक्षा वेगळा अनुभव मिळतो.

ऐतिहासिक वास्तूंचा वारसा

गोव्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू पणजीत आहेत. रेईस मॅगोस किल्ल्यावरून पणजी शहराचा सुंदर देखावा दिसतो, तर जुन्या गोव्याला भेट देऊन कला संग्रहालय पाहता येतं. या वास्तू म्हणजे गोव्याच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष आहेत.

पुस्तकांची मनमोहक दुनिया

पुस्तकांची आवड असणाऱ्यांसाठी पणजी म्हणजे स्वर्गच आहे. सिंबल बुक हाऊस, कृष्णदास शामा लायब्ररी, वर्षा बुक स्टॉल आणि ब्रॉडवे बुक स्टोअर यांसारखी ठिकाणं पुस्तकांच्या खजिन्यांनी भरलेली आहेत. इथे विविध विषयांची पुस्तके मिळतात, ज्यामुळे वाचनप्रेमींना एक वेगळाच आनंद मिळतो.

खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

पणजीमध्ये विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ मिळतात. स्थानिक गोव्यातील माशांच्या थाळीसाठी कोंकणी कॅन्टीन, रिट्झ क्लासिक किंवा कॅफे भोंसले यांसारख्या ठिकाणी नक्की भेट द्या.

Panjim tourism
Goa Tourism: चुभती, जलती गर्मी का मौसम आया! गोव्यातील बीच रिकामे; टॅक्सी, हॉटेल व्यवसायावर परिणाम

आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसाठी माकुत्सु, ताताकी किंवा मिगेल यांसारख्या ठिकाणी जा. लुसो-गोवन खाद्यपदार्थांसाठी हॉर्सशू रेस्टॉरंट, पादारिया प्राझेरेस आणि व्हिवा गोवा हे उत्कृष्ट पर्याय आहेत. प्रत्येक ठिकाणची चव वेगळी असून, ती जिभेवर रेंगाळणारी आहे.

खरेदीचा आनंद

पणजीमध्ये खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पणजी मार्केटमध्ये स्थानिक हस्तकला, बांबूच्या टोपल्या आणि हंगामी फळे मिळतात. मारियो मिरांडा स्टोअरमध्ये त्यांची सुंदर कला असलेली पोस्टकार्ड आणि चित्रे मिळतात. अझुलेजोस दे गोवामध्ये गोव्याची पारंपरिक कला असलेली अझुलेजोस मिळतात, तर १८ जून रोड आणि एमजी रोडवर खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक ठिकाणची खासियत वेगळी असून, ती पर्यटकांना आकर्षित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com