Cold Increased
Cold IncreasedDaink Gomantak

Panaji Temperature Drop: पणजीत थंडीचा कडाका वाढला

पणजीत या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची नोंद
Published on

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडी अनुभवायला सुरुवात झाली आहे. तसं बघितलं तर साधारणतः दिवाळी नंतर थंडीला सुरुवात होते. परंतु गेल्या काही वर्षात ऐन थंडीच्या ऋतूत समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी बरसला होता. त्यामुळे गोवेकरांना थंडीचा आनंद अनुभवता आला नव्हता. परंतु यंदा मात्र गोव्यात विशेषतः पणजीमध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस खाली जाताना आपल्याला अनुभवता येतोय. रात्री उशिरापासून गारठा वाढत आहे. तर दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका जाणवत आहे.

यंदाच्या मोसमात राज्यभरात चांगल्याच पावसाची नोंद झाल्याने येणार्‍या काही महिन्यात पार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.राज्यात सध्या काही ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळतेय. थंडीचा कडाका वाढल्यामुळे दररोज सकाळी वॉकला जाणाऱ्यांची गर्दी दिसत नसल्यामुळे रस्त्यावर सामसूम आहे. गोव्यातील ग्रामीण भागात लोक थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोटीचा आनंद घेत असल्याचं चित्रही दिसतंय.

Cold Increased
Goa Latest News: 'नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य शिक्षण ही काळाची गरज' - चंद्रकांत शेट्ये

पणजीत आज किमान तापमान १७.९ अंश नोंदवले गेले जे या वर्षातील आणि या महिन्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. हे यावेळी सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश कमी आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. पणजीमध्ये कमाल तापमान 32 अंश नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 1.2 अंश कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com