भटक्या कुत्र्यांची डिचोलीत दहशत

भटक्या कुत्र्यांचा (Dogs) मोठा घोळका रात्रीच्या वेळी मागे लागतो
Dogs in Bicholim
Dogs in BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: नागझरवाडा- डिचोली (Bicholim) येथे भटक्या कुत्र्यांचा (Dogs) मोठा घोळका रात्रीच्या वेळी येथून जाणाऱ्यांची पाठ धरू लागला असून येथील रुग्णालयांत येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला करून त्यांना चावे घेण्याचे प्रकार घडल्याचे वृत्त आहे. मुक्या प्राण्यांना मारू नये, असा कायदा असल्याने प्रशासनाने हात पांघरून बसण्याचे सोयिस्कर धोरण अवंलबिल्याची संतप्त प्रतिक्रिया वासुदेव मयेकर यांनी दैनिक ‘गोमन्‍तक’ला दिली.

आपण रात्री उशिरा एका परिचिताकडे येथून जात असताना पंधरा ते वीस कुत्रे आपल्या दिशेने धावत आले. हातात छत्री असल्याने आपण थोडक्यात बचावलो, अन्यथा आपल्याला त्यांनी चावे घेऊन फाडलेंच असते, असे ते म्हणाले. या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची नाटके अपयशी ठरतात व त्यांचा वंश वाढत असून भविष्यांत ही वाढती संख्या लहान मुलांच्या जीवावर बेतू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

Dogs in Bicholim
Goa: भटक्या कुत्र्यांचा 8 वर्षीय मुलीवर हल्ला

या कुत्र्यांसंदर्भांत आपण पशुपालन खात्याला कल्पना दिली असल्याची माहिती येथील डॉ. विठ्ठल म्हार्दोळकर यांनी दिली. मात्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपली विनंती मनावर घेतलेली नाही, असे ते म्हणाले. रुग्णालयात येणारे अनेक बेसावध रुग्ण कुत्रे अंगावर चालून आल्यामुळे प्रचंड धास्तावलेले असतात.

Dogs in Bicholim
Goa Election: पेडणेकरांना पोहचली बाबू ब्रॅण्डची बाटली

या परिसरात कोणत्याही वेळी गेल्यास किमान वीस कुत्रे इतस्ततः बसलेले दिसतात. दिवसा ते जरी शांत असले तरी रात्री हिंसक होतात. त्याना लोकवस्‍तीपासून दूर नेऊन कोंडवाड्यात ठेवणे, हाच पर्याय असल्याचे तुकाराम शेट यांनी सांगितले. डिचोली नगरपालिका आणि स्थानिक आमदारांना याची दखल घेऊन नागरी हितास्तव संबंधित खात्याला कार्यप्रवण करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com