Pandurang Madkaikar
Pandurang MadkaikarDainik Gomantak

Pandurang Madkaikar: 20 लाख लाच प्रकरण ‘गुंडाळले’? मडकईकरांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात काहीच तथ्य नाही; ACB ची माहिती

Pandurang Madkaikar Allegations: एका सत्ताधारी मंत्र्याला छोट्याशा कामासाठी १५ ते २० लाख रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप मडकईकर यांनी केला होता.
Published on

Pandurang Madkaikar corruption case

पणजी: कुंभारजुवेचे माजी आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात काहीच तथ्य नाही. त्यांनी ज्या रकमेबाबत आरोप केला होता, तो जमिनीसाठीच्या शुल्क व दंडात्मक रकमेसंदर्भात होता अशी जबानी दिली आहे.

त्यामुळे एसीबीने केलेल्या प्रथमदर्शनी चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत नसल्याने हा तपास बंद करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी दिली.

एका सत्ताधारी मंत्र्याला छोट्याशा कामासाठी १५ ते २० लाख रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप मडकईकर यांनी केला होता. त्यांच्या चौकशीची मागणी करणारी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दाखल झाली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी मडकईकर यांना बोलावून एसीबीने चौकशी केली होती. तसेच त्यांची जबानी नोंदवून घेतली होती.

Pandurang Madkaikar
Goa Corruption Case: "मडकईकरांना चौकशीसाठी बोलावून शहानिशा करा", तक्रारदारांची ACBकडे मागणी

मडकईकर यांनी जमिनीसाठीचे चलन व दंडात्मक रक्कम मिळून सुमारे ४६ लाखे रुपये जमा केले होते व त्याची पावती देण्यात आली होती. या एकून ४६ लाखांपैकी चलन शुल्काची रक्कम २४ लाख ७८ हजार २१० रुपये तर दंडात्मक रक्कम २१ लाख २९ हजार ४०० रुपये होती.

Pandurang Madkaikar
Pandurang Madkaikar: ..ती रक्कम तर सरकारी शुल्क! पांडुरंग मडकईकरांचा ‘यू-टर्न’; 19 मार्च रोजी सुनावणी

या दोन्हींची पावती त्यांनी चौकशीवेळी सादर केली. ज्या रकमेसंदर्भात त्यांनी विधान केले होते, ते या रक्कमेचे होते असे दिलेल्या जबानीत नमूद केले आहे, असे आल्‍बुकर्क यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयातही तक्रार दाखल झाली आहे. न्यायालयाने एसीबी पोलिस अधीक्षक व निरीक्षकांना नोटीस बजावली आहे व त्याचे उत्तर देण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com