पंचायत निवडणुका जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शक्य; माविन गुदिन्हो यांची माहिती

अजून पंचायत निवडणुकांच्या तारखा अधिकृतपणे जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या पुढे ढकलण्याची शक्यता असून जास्त करुन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्या होण्याची शक्यता आहे.
Mavin Gudhino
Mavin GudhinoDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील पंचायत निवडणुका 4 जून रोजी होतील असा अंदाज होता. काही दिवसांपूर्वी स्वत: पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी या तारखेचा उच्चार केला होता. मात्र अजून पंचायत निवडणुकांच्या तारखा अधिकृतपणे जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या पुढे ढकलण्याची शक्यता असून जास्त करुन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्या होण्याची शक्यता आहे. (Panchayat elections possible in second week of June Mavin Gudinho)

Mavin Gudhino
पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या वाहन प्रक्रियेचे होणार पुनरावलोकन : माविन गुदिन्हो

मडगावात एका कार्यक्रमावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांना या संदर्भात प्रश्र्न विचारला असता त्यांनी सांगितले की, पंचायतीचे प्रभाग निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तसेच कुठले प्रभाग आरक्षित केले जातील याचा सुद्धा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पंचायत निवडणुका एका आठवड्याने पुढे ढकलाव्या लागतील, असे त्यानी सांगितले.

या निवडणुका जास्त करुन रविवारी घेतल्या जातात. त्याप्रमाणे अंदाज केला तर त्या 12 जून रोजी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचायत निवडणुका पक्षपातळीवर लढवू नये. मात्र यासाठी सर्व गावकऱ्यांचा पाठिंबा व सहकार्य अपेक्षित आहे. सरकारला सुद्धा ग्रामीण भागाचा विकास व्हावा असे वाटते व त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आणि म्हणूनच सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com