फोंड्यात पंचायत निवडणुकीचे ‘पडघम’

19 पंचायतीतही लगबग: मंत्र्यांचा ‘वरदहस्त’ मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड
Panchayat Election
Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी तात्विकदृष्ट्या पंचायत निवडणूकीची तारीख 4 जून ठरविल्यामुळे आता पंचायत निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. सध्याच्या पंचायतीचा काळ जून महिन्यात संपत असल्यामुळे निवडणूक जून मध्ये होणे अपेक्षित आहे. आणि त्याप्रमाणे सरकारने तसेच निवडणूक आयोगाने प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दरम्यान, फोंडा तालुक्यातील 19 पंचायतींमध्येही लगबग सुरू झाली असून नेत्यांच्या पाठिंबा मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे.

Panchayat Election
पेडणे तालुका तीन तास अंधारात...

त्यामुळे फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघांत एकूण अठरा पंचायती येतात. त्यापैकी कुर्टी- खांडेपार पंचायत ही फोंडा मतदारसंघात तर वेलिंग -प्रियोळ-कुंकळ्ये, केरी, वेरे-वाघुर्मे, वळवई, भोम-हडकोण, बेतकी-खांडोळा, तिवरे-वरंगाव या सात पंचायती प्रियोळ मतदारसंघात, कवळे, वाडी-तळावली, दुर्भाट-आडपई- आगापूर, बांदोडा, कुंडई व मडकई या सात पंचायती मडकई मतदारसंघात तर बोरी, शिरोडा, बेतोडा -निरंकाल व पंचवाडी या चार पंचायती शिरोडा मतदारसंघात येतात. आता असे विभाजन असल्यामुळे मडकई प्रियोळ व शिरोडा हे तीन मतदारसंघ संपूर्णपणे पंचायतीवर अवलंबून असलेले दिसतात.

कोणत्याही प्रकारे या पंचायती आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न चारही मंत्री करणार हे निश्चित आहे. आणि सध्याची परिस्थिती पाहता या पंचायती संबंधीत आमदारांच्या कह्यात जाणार असाच रंग दिसतो आहे. अर्थात हे सर्व पुढील दीड महिन्यात होणाऱ्या घडामोडीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे भाजपचे चारी मंत्री आपल्या मतदारसंघातील पंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी होतात,का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Election 2027
Sewage Water In Colva Creek
Goa Assembly Election 2027 updates
Tiger Death In Goa 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com