Panajim Municipality : स्मार्ट सिटीच्या कामांवर बोलावणार विशेष बैठक

महापौरांचे आश्‍वासन : मडकईकरांची मागणी मान्य
Panajim Municipality
Panajim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Smart City : पणजीत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. पहिल्याच पावसात पणजी ‘जलमय’ झाली आहे. त्यामुळे खास स्मार्ट सिटीच्या कामांवर संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी बोलावून बैठक घ्यावी,

अशी मागणी नगरसेवक उदय मडकईकर यांनी केली होती. ती मागणी मान्य करीत विधानसभा अधिवेशनानंतर बैठक बोलविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन आज महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिले आहे.

मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. याप्रसंगी आयुक्त क्लेन मेदेरा, उपमहापौर संजीव नाईक यांची उपस्थिती होती. मडकईकर यांनी सांगितले की, ८०० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीची कामे झाली आहेत.

परंतु पहिल्याच पावसात जागोजागी पाणी साचले. आम्हाला लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल), सार्वजनिक बांधकाम खाते, मलनिस्सारण विभाग,

Panajim Municipality
Goa G20 Meeting: गोव्यात यापुढे पर्यटकांसाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनेच; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

जलस्रोत खाते, वाहतूक विभाग अशा विविध विभागातील अधिकारी, तसेच कंत्राटदार यांना बोलावून स्मार्ट सिटीवर विशेष बैठक घ्यावी. मडकईकर यांची ही सूचना महापौर मोन्सेरात यांनी मान्य केली.

दिरंगाई का?

याप्रसंगी मिरामारमधील विकासकामांना दिरंगाई का? असा सवाल नगरसेवक ज्योएल आंद्रादे यांनी उपस्थित केला. पणजीतील या स्थितीमुळे नगरसेवक म्हणून बसलेल्या आम्हा प्रत्येकाला लाज वाटत आहे, अशी संतप्त भावना आंद्रादे यांनी व्यक्त केली. दरम्यान, इतिवृत्तावर असलेल्या पे-पार्किंग, सोपो कर आकारणी कामांना मंजुरी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com