पणजी : आपल्या बासरीवादनाने देश विदेशातील रसिकांवर मोहिनी घातलेले विख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या बासरी वादानाचा मनमुराद आनंद रसिकांनी (Program) शनिवारी लुटला.
युनियन बँक (Union Bank) प्रस्तुत व विविक्ता इंटरटेनर्स आयोजित 'माहिर' मैफली अंतर्गत पं. मुजुमदार यांचे वादन झाले. झिंजोटी राग आलाप, जोड,झाला व विलंबित रूपक व द्रुत तिनतालमधील दोन गती अशा क्रमाने त्यांनी वादन केले.आलापीने सुरवातीलाच त्यांनी वातावरण भारून टाकले. खर्जातील संयत आलापी तसेच तार सप्तकातील हृदयाला भिडणाऱ्या आर्त आलापीने छान माहोल त्यांनी निर्माण केला. जोड मधील लायकरीचे अंग आणि झलामधील कौशल्य यामुळे त्यांचे वादन उत्तरोत्तर रंगत गेले.
त्यानंतर त्यांनी महादेव प्रसाद मिश्रा यांची एक नजाकतदार ठुमरी वाजवून श्रोत्यांना वेगळ्या भावविश्वात रममाण केले आणि उस्ताद फैयाज खांसाहेब यांची बाजू बंद खुल खुल जाय.. ही प्रसिद्ध भैरवी रचना त्यातील आर्त भावाच्या अंगाने वाजवून रसिकांच्या हृदयाची तार छेडली. त्यातील विविध हरकती दिलखेचक होत्या. काही गाऊनही त्यांनी पेश केल्या.त्यांना यांचे शिष्य कल्पेश यांनी बासरीवर उत्कृष्ट साथ दिली. तबल्याच्या साथीला होते व्ही. नरहरी, मात्र त्यांची साथ तोडीस तोड झाली नाही न पेक्षा अजून मजा आली असती.
आयोजनात सहकार्य केलेले एक पुरस्कर्ते ओसवाल मार्टिन्स व त्यांच्या पत्नी आलझिरा तसेंच प्रमुख पाहुणे,कला अकादमीच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व नृत्य विभागाचे संचालक प्रेमानंद आमोणकर यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला.विविक्ता च्या संचालक विशाखा अगरवाल यांनी स्वागत केले. संजय मिसर यांनी सूत्रसंचालन केले.
कोरोना (corona) महामारी काळात ऑनलाइन कार्यक्रम केले पण श्रोत्यांशी आदानप्रदान नसल्याने आनंद मिळत नव्हता. त्याला मुकलो होतो मात्र आज श्रोते कमी असले तरी त्यांच्यासमोर वाजवण्याचा आनंद मिळाला, छान वाटलं. गायन, वादन, नृत्य, अभिनय आदी कला आनंद उत्पन्न करतात. संगीत ही तर आध्यात्मिक अनुभूती आहे.
पं. रोणू मुजुमदार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.