Panaji News : लेखक साहित्यसृष्टीचा जनक : लक्ष्मण पित्रे

Panaji News : ‘आयएमबी’तर्फे वजरी येथे लेखक मेळावा उत्साहात साजरा
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, परमेश्वराने आपल्याला दिलेली प्रतिभा, विचारशक्ती ही अलौकिक देणगी आहे. लेखक चांगल्या कल्पना, अनुभव संचित मांडून साहित्यसृष्टी निर्माण करतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण पित्रे यांनी वजरी-पेडणे येथे केले.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, पणजीतर्फे वजरी येथील हिरा फार्मवर शनिवार व रविवारी आयोजिलेल्या लेखक मेळाव्यात पित्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव अशोक परब उपस्थित होते.

दशरथ परब म्हणाले, अशा मेळाव्यांतून लेखक एकत्र येतात. विचारांचे आदान-प्रदान होऊन लेखकांना नवी ऊर्जा मिळते. अशोक परब यांनी आभार मानले. पहिल्या सत्रात डॉ. जयंती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कथावाचन झाले. यात मेघना कुरुंदवाडकर, नारायण महाले, दयाराम पाडलोसकर, नयना आडारकर यांनी कथा वाचल्या. डॉ. आशा गेहलोत यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

दुसऱ्या सत्रात मनोहर भिंगी यांची मिमिक्री आणि काही लेखकांनी कलागुणांचे दर्शन घडविले.

यावेळी दशरथ परब, रमेश वंसकर, वसंत सावंत यांची मुलाखत राजमोहन शेट्ये यांनी घेतली. शेवटच्या सत्रात संजीव कडकडे, कविता आमोणकर, शर्मिला प्रभू, अपर्णा गारुडी यांनी ललित साहित्य सादरीकरण केले.

मेघना कुरुंदवाडकर, डॉ. आरती दिनकर यांच्या पुस्तकांचे लक्ष्मण पित्रे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दशरथ परब यांनी समारोपाचे भाषण केले.

कविसंमेलनात रसिक मंत्रमुग्ध :

दुसऱ्या सत्रात जॉन आगियार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगले. यात राजू भि. नाईक, डॉ. आरती दिनकर, डॉ. नीता तोरणे, रजनी रायकर, माया खरंगटे, नितीन कोरगावकर, नरेंद्र नाईक, शीतल साळगावकर, श्रमी भौंन्सुले, तुकाराम शेट, सृष्टी नाईक, प्रदीप नाईक, गौरीश वेर्णेकर, विनोद नाईक, दशरथ परब, ॲड. लक्ष्मी महात्मे, इंदू परब, नूतन दाभोलकर, वसंत सावंत यांनी कविता सादर केल्या. कालिका बापट यांनी संचालन केले.

Panaji
Goa Crime News: नवजात अर्भकाचे आढळले फक्त पाय, शरीर गायब; डोंगरी-मंडूर परिसरात खळबळ

तरुणांच्या कलागुणांना वाव द्या : सामंत

आजची तरुणपिढी प्रतिभावंत, गुणवंत आहे. त्यांना साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये सामावून घेतले पाहिजे. त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. कस लावल्याशिवाय साहित्य प्रसिद्ध केले जाणार नाही, असे सांगणारे मासिक गोव्यात हवे आणि उत्तमाकडून सर्वोत्तम लेखन करण्याकडे लेखकांचा कल हवा, असे मत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com