World Book Day 2024 : आपल्या मुलांच्या हाती ‘स्मार्ट मेंदू’ तयारी करणारी पुस्तके द्या; पांडुरंग नाडकर्णी यांचे पालकांना आवाहन

World Book Day 2024 : मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन जागतिक पुस्तक दिन कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना नाडकर्णी म्हणाले की, वाचनामुळे विचार क्षमता असणारी मुले जीवनात नेत्रदीपक कामगिरी करू शकतात.
Panaji World Book Day 2024
Panaji World Book Day 2024 Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

World Book Day 2024 :

पणजी, काही क्षणात माहिती मिळविण्यासाठी ‘स्मार्ट फोन’ नावाच्या यंत्राच्या नादी मुलांना न लावता, त्यांना हाती स्मार्ट मेंदू घडवणारी पुस्तके द्या. मुलांना पुस्तके वाचण्याची गोडी निर्माण करा, असे आवाहन जेष्ठ गोमंतकीय शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी यांनी आज पालकांना केले.

पाटो पणजी येथील कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे आयोजित जागतिक पुस्तक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाडकर्णी बोलत होते. याप्रसंगी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक मिलिंद माटे, मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्युरेटर डॉ. सुशांत तांडेल, साहाय्यक राज्य ग्रंथपाल सुलक्षा कोळमुळे, प्रशांत फडते, कार्यक्रम प्रमुख सिंधू दामले आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन जागतिक पुस्तक दिन कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना नाडकर्णी म्हणाले की, वाचनामुळे विचार क्षमता असणारी मुले जीवनात नेत्रदीपक कामगिरी करू शकतात.

छंद जोपासा

ज्यावेळी मुलांचा सर्वाधिक आवडता छंद हा पुस्तक वाचन होईल त्यावेळेपासून मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना तीव्रतेने सताविणार नाही. कारण पुस्तक वाचन सातत्यापुर्वक करणारी मुले स्वत:च्या जीवनात योग्य ते निर्णय घेण्याएवढी नक्कीच सक्षम असतील.

म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या हातात स्मार्ट फोन ऐवजी ‘स्मार्ट मेंदू’ तयार करणारी पुस्तक देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Ganeshotsav Noise pollution Goa
Virat Khdapkar six year old Goa boy Kedarnath world record
Gomantak newspaper February 1963
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com