Panaji News : वितरणातील त्रुटींमुळेच पाणीटंचाईचे संकट; मुख्य अभियंता प्रमोद बदामी

Panaji News : यामुळे आजही ३६ टक्के जलसाठा धरणांत आहे. त्यातच सिंचनासाठी पाणी पुरवठा बंद होणार असल्याने जुलै अखेरीपर्यंत पुरेल एवढा जलसाठा राज्यांतील धरणांत आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, येत्या बुधवारपासून (ता.१५) सिंचनासाठी धरणांतून पाणी पुरवठा केला जाणार नाही. दरवर्षी १५ मेपासूनच हा पुरवठा बंद करण्याची पद्धती आहे.

त्यामुळे राज्याला जूनमध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत पेयजलाची चणचण भासणार नाही, असे जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले. ते म्हणाले, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याचे वितरण हे दोन वेगवेगळे विषय आहे. एकेकदा पाणी असते पण वितरणाच्या पातळीवर काही त्रुटी असतात, त्यामुळे राज्याच्या काही भागात पाणी टंचाई असल्याचे चित्र निर्माण होते.

ते म्हणाले, सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस असतो. त्या काळात धरणातील पाणी जल शुद्धीकरण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर घेतले जात नाही. साधारणः ऑक्टोबरपासून हे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पांना पुरवले जाते. गेल्या सहा महिन्यात सिंचन आणि पेयजलासाठी मिळून धरणांतील ६४ टक्के जलसाठा पुरवण्यात आला आहे.

Panaji
Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

यामुळे आजही ३६ टक्के जलसाठा धरणांत आहे. त्यातच सिंचनासाठी पाणी पुरवठा बंद होणार असल्याने जुलै अखेरीपर्यंत पुरेल एवढा जलसाठा राज्यांतील धरणांत आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंजुणे धरणात २१.२ टक्के, आमठाणे धरणात ३२.६ टक्के, पंचवाडी धरणात २३.७ टक्के, चापोली धरणात ४८.५ टक्के, गावणे धरणात ४८.९ टक्के तर तिळाऱी धरणात ३६.२ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा जुलैपर्यंत पेयजलासाठी पुरेसा आहे. अनेकदा उन्हाळ्यात घरातील पाणी वापरासाठी मागणी वाढते.

जलशुद्धीकरण प्रकल्पांतून जलकुंभात पाणी पोचणे आणि तेथून ते घरोघरी पोचवणे या यंत्रणेवर ताण येणे असे घडते. याचा अर्थ राज्यात पाणी टंचाई आहे असा घेतला जाऊ नये. पाण्याची उपलब्धता आणि वितरण हे स्वतंत्र विषय असून सार्वजनिक बांधकाम खात्याचा आरोग्य अभियांत्रिकी विभाग पाणी वितरीत करतो. अनेकदा घऱात पाणी कमी मिळाले की लोकांना राज्यासमोर पाण्याचे संकट आहे असे वाटते पण ते चुकीचे आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com