Panaji News : लैंगिक अत्याचार सहन करू नका, त्याविरोधात आवाज उठवायला हवा

पडवळकर: ‘वसंत व्ही. एस. कुंकळेकर’मध्ये जागृती शिबीर संपन्न
awareners Crime News
awareners Crime NewsDainik Gomantak

Panaji News : लैंगिक अत्याचारांविरोधात पीडितांनी आवाज उठवायला हवा. यौन शोषणाला बळी पडलेल्या आणि गुपचूप सहन करणाऱ्यांच्या शरीरावर आणि मनावर अनेक वाईट परिणाम होतात. समाजातील घटकांनीही अशा पीडितांना समजून घेत त्यांची मदत करायला हवी.

असे प्रकार रोखण्यासाठी मुली, स्त्रिया आणि लहान मुले यांचीही काळजी घ्यायला हवी. या प्रकारचे गुन्हे उजेडात येणे आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलिस निरिक्षक सतिश पडवळकर यांनी केले. जुने गोवे येथील वसंत व्ही. एस. कुंकळेकर उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय जागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी ते ‘सायबर क्राईम, रस्ता सुरक्षा आणि लैंगिक हिंसा’ या विषयांवर बोलत होते. विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबाबत काय खबरदारी घ्यायला हवी याबद्दल त्यांनी माहिती विषद केली. पडवळकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देत शंकानिरसन केले.

awareners Crime News
Panaji Municipal Corporation : पणजी महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज

अन्नपदार्थांविषयी मार्गदर्शन

शिबिराच्या पहिल्या दिवशी डार्लिंन दिवकर यांनी विद्यार्थ्यांना अन्नपदार्थांविषयी मार्गदर्शन केले. ‘ऋतूनुसार उपलब्ध फळे, पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्‍यक आहे. जेवताना स्वच्छता राणे महत्त्वाचे आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाताना त्याचा दर्जा तपासायला हवा. आपण जे खातो त्याने आपले शरीर बनते आणि मनात तसे विचार येतात. त्यामुळे स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक अन्नाचे सेवन आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com